24 new patients of corona in the district; 18 corona free
24 new patients of corona in the district; 18 corona free 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात कोरोनाचे नवे 24 रुग्ण; 18 जण कोरोनामुक्त

शैलेश पेटकर

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळून आले. 18 जण कोरोनामुक्त झाले. महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात सहा रुग्ण आढळून आले. बाधितांची संख्या 47 हजार 978 झाली आहे. 

आज 316 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यात सात बाधित आढळले. 784 जणांची अँटीजेन तपासणी केली. त्यात 20 जण बाधित आढळले. आटपाडी तालुक्‍यात तीन, जत तालुक्‍यात सहा, कवठेमहांकाळमध्ये एक, खानापूर तालुक्‍यात पाच, पलूस तालुक्‍यात दोन, तासगाव तालुक्‍यात एकास बाधा झाली. महापालिका क्षेत्रातील सांगली शहरात पाच, तर मिरज शहरातील एकास बाधा झाली. 

परजिल्ह्यातील आज नवे तीन रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले. परजिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1540 इतकी असून त्यापैकी 1306 रुग्ण बरे झाले आहेत. गृहअलगीकरणात 100 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात 63 जण उपचार घेत आहेत. 

सध्याची स्थिती अशी ः आजचे बाधित ः 24, उपचाराखाली ः 178, बरे झालेले ः 46 हजार 055, मृत्यू ः 1745, बाधित ः 47 हजार 978, चिंताजनक 37, ग्रामीण बाधित ः 24 हजार 275, शहरी बाधित ः 7 हजार 155, मनपा क्षेत्रात बाधित 16 हजार 548.  जिल्ह्यात आज 24 रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 हजार 978 झाली आहे. 

तालुकानिहाय कोरोनाबाधित 
आटपाडी : 2483 
जत : 2253 
कडेगाव : 2933 
कवठेमहांकाळ : 2469 
खानापूर : 2951 
मिरज : 4532 
पलूस : 2628 
शिराळा : 2291 
तासगाव : 3402 
वाळवा : 5488 
महापालिका : 16548 
एकूण 47 हजार 978

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT