collector office.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात तीन महिन्यांसाठी 27600 टन मोफत तांदूळ 

सकाळवृत्तसेवा

सांगली- कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून पात्र लाभार्थींना एप्रिल ते जून तीन महिन्यांसाठी प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतंर्गत शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य व्यतिरिक्त प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 18 लाख 40 हजार 207 लाभार्थींना प्रति महिना 9200 टन असे 27 हजार 600 टन तांदळाचे वाटप केले जाणार आहे. तिनही महिन्यात पहिल्या आठवडात नियमित राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील धान्य वाटप होईल तर पुढील काळात मोफत तांदळाचे वाटप केले जाणार आहे. 

धान्य वितरणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल, मे व जून 2020 महिन्यांसाठी नियमित अन्न सुरक्षा योजनेतील धान्य अत्योदयसाठी महिन्याला 35 किलो आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थींना माणसी 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू सवलतीच्या दरात मिळेल. एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील नियमित अन्नधान्याचे वाटप पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांना पूर्ण होईल व त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत तांदळाचे वाटप प्रति लाभार्थी 5 किलो प्रमाणे करण्यात येईल. या प्रमाणेच मे व जूनचे वितरीण होईल.

मोफत तांदळाकरिता लाभार्थ्यांनी कोणतेही शुल्क भरावयाचे नाही. जे लाभार्थी एप्रिल महिन्यातील नियमित धान्य कोटा उचल करतील त्यांना मोफतचा तांदूळ मिळणार आहे. धान्य वाटताना ई-पॉस व्दारे मिळालेली पावती ग्राहकाला देणे अनिवार्य असल्याच्या सूचना रास्तभाव दुकानदार यांना दिल्या आहेत. ई-पॉस वर काही तांत्रिक अडचण आल्यास हस्तलिखित पावती दुकानदार ग्राहकांना देतील. दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकास घरपोहोच धान्य द्यावयाचे आहे. अपरिहार्य कारणास्तव शिधापत्रिकाधारकास रास्तभाव दुकानावर जावे लागल्यास सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा 

  • अंत्योदय कुटूंबसंख्या 32 हजार 
  •  प्राधान्य योजना कुटुंबसंख्या 3 लाख 65 हजार 514 
  •  एकूण 18 लाख 40 हजार 207 लाभार्थ्यी 
  •  अंत्योदय, प्राधान्यसाठी एप्रिलसाठी 5632.1 टन गहू व 3778 टन तांदूळ 
  •  मोफत तांदूळ एप्रिससाठी 9200 टन 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परवडणारी घरे, मोफत वीज, स्वस्त बस भाडे अन् महिलांसाठी मासिक भत्ता... ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात मोठ्या सवलतींची घोषणा

Akola Police : अकोला पोलिसांची ‘स्मार्ट पोलिसिंग’कडे पाऊल; AI-आधारित WhatsApp चॅटबॉट ‘अकोला कॉप कनेक्ट’चा शुभारंभ!

Latest Marathi News Live Update: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भांडुपमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मैदानात

Nawab Malik Statement :नवाब मलिकांचं मुंबई महापौर पदाबाबत मोठं विधान अन् भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले...

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

SCROLL FOR NEXT