पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : बाजार समित्यांची २७ ला अंतिम प्रारूप यादी

ग्रामपंचायत, सोसायटीचे नवे सदस्य होणार मतदार; हरकतीसाठी ८ मार्चची मुदत

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांकरिता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्या बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील सांगलीसह, तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, वाळवा आणि शिराळा बाजार समित्यांच्या अंतिम मतदार यादीवर बदल करण्यात येत आहे. ग्रामपंचायत आणि विकास सोसाट्यामध्ये नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश बाजार समित्यांच्या मतदारांमध्ये होणार आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारीला अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. त्या यादीवर ८ मार्चपर्यत हरकतीसाठी मुदत आहे.

मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनामुळे बाजार समित्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. दीड वर्षे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून जिल्ह्यातील सांगली, तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, वाळवा आणि शिराळा बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त केले होते.

एप्रिलपूर्वी त्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश न्यायालयाने पणन संचालकांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांच्या निवडणुकीची मतदार यादी निश्चित करण्याचे सहकार प्राधिकरणकडून देण्यात आले आहेत.

राज्यात १ सप्टेंबर २०२२ नंतर ९ हजार ५२५ ग्रामपंचायती व ११३२ प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नव्या सदस्यांची निवड झालेली आहे. ते निवडून आलेले सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीस पात्र झाले असून, त्या पात्र सदस्यांचा समावेश होण्यासाठी मतदार याद्या सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीकरिता अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत.बाजार समित्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर २०२२ नंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट करून अंतिम मतदारयादीत सुधारणा करण्याचा कालावधी १० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत निश्चित केला आहे.

सुधारित प्रारूप मतदार यादी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्या यादीवरील आक्षेप, हरकती २७ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. आक्षेपांवरील निर्णय ८ मार्च ते १७ मार्चपर्यंत घ्यावेत. तर, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २० मार्चपर्यंत सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

मतदार यादी कार्यक्रम असा

  • अंतिम मतदार यादीत सुधारणा कालावधी- १० ते २४ फेब्रुवारी

  • सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध- २७ फेब्रुवारी

  • मतदार यादीवरील हरकती- २७ फेब्रुवारी ते ८ मार्च

  • हरकतींवर सुनावणी व निर्णय -८ ते १७ मार्च

  • सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - २० मार्च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT