nepal return 
पश्चिम महाराष्ट्र

नेपाळहून परतले 28 जण; एक सांगलीतील रुग्णालयात

सकाळवृत्तसेवा

सांगली ः नेपाळला सहलीला गेलेले सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 28 लोक आज परतले. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील नागज येथे फाट्यावर तपासणी सुरु असताना अचानक प्रवासी बस दत्त म्हणून हजर झाली.

प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. त्यातील एक प्रवाशाला खोकला अधिक प्रमाणात होता. त्यामुळे त्याला तत्काळ सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य प्रवाशांच्या हातावर शिक्का मारून त्यांना "घरीत थांबा', असे सक्तीचे आदेश देण्यात आले.


याबाबत महापालिका प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याती 28 लोकांना घेऊन तीर्थक्षेत्र दर्शन घडवण्यासाठी केलेली बस आज दुपारी नागज फाटा येथे आली. त्या ठिकाणी लोकांनी पर्यटन व तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेल्याचे सांगितले. त्यावर तेथील अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून हातावर शिक्के मारले. त्यांना पुढील 14 दिवस घरीच थांबा, असे आदेश दिले. ही बस मिरजेत आल्यानंतर महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी वाहनाची तपासणी केली. लोकांशी संवाद साधला.

त्याआधी मिरज शहरातील आठ लोक त्यांच्या घरी रवाना झाले होते. त्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क करण्यात आला. या लोकांना पुढील 14 दिवस घरातून बाहेर पडू नका, वैद्यकीय यंत्रणा सतत संपर्कात राहील, असे सांगण्यात आले. त्यापैकी एकाला खोकला असल्याने तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उर्वरीत प्रवासी कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करून 14 दिवसांसाठी घरातच थांबवण्यात येणार आहे.


पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गील यांनी संबंधित प्रवासी वाहतूक यंत्रणेला खडसावले. इतके दिवस नेपाळमध्ये फिरून आले आहात, त्याची माहिती प्रशासनाला का दिली नाही, असा जाब त्यांनी विचारला.

""नागज फाट्यावर झालेल्या तपासणीनंतर या लोकांच्या हातावर शिक्के मारले आहेत. पूर्ण दक्षता घेतली जात आहे. अशा पद्धतीने कुणी बाहेरून आले असेल तर प्रशासनाशी संपर्क साधला पाहिजे.''

उपायुक्त स्मृती पाटील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

SCROLL FOR NEXT