Drought Jat Atpadi Taluka Sangli
Drought Jat Atpadi Taluka Sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Drought Crisis : दुष्काळी तालुक्यांतील प्रकल्पांत फक्त 28 टक्के पाणी; 53 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा

बलराज पवार

मॉन्सूनच्या (Monsoon) हंगामात सरासरीच्या तब्बल ३० टक्के पाऊस कमी झाला. त्यामुळे डिसेंबरनंतर पाणीटंचाई भीषण होण्याची भीती व्यक्त होत होती.

सांगली : जिल्ह्यात गतवर्षी ३० टक्के पाऊस (Rain) कमी झाल्याचे परिणाम दिसू लागलेत. दुष्काळी तालुक्यांना टंचाईच्या (Water Shortage) झळा जाणवू लागल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून सध्या ५३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात ८३ प्रकल्प आहेत. जानेवारीअखेर २८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के पाणीसाठा कमी आहे. आता उन्हाळा तोंडावर असून टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या (Monsoon) हंगामात सरासरीच्या तब्बल ३० टक्के पाऊस कमी झाला. त्यामुळे डिसेंबरनंतर पाणीटंचाई भीषण होण्याची भीती व्यक्त होत होती. दरम्यान, जनरेट्यामुळे सिंचन योजनांचे आवर्तन सुरू करण्यात आले. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील टंचाई काही प्रमाणात कमी झाली. परंतु तलावातील पाणीसाठा कमीच होत आहे.

जत, आटपाडी (Atpadi) तालुक्यांत काही गावांना जूनपासूनच टंचाई जाणवत होती. तेथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र ही टंचाई वाढत चाललीय. जत तालुक्यात ५०, तर आटपाडी तालुक्यात तीन गावांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खानापूर व कवठेमहांकाळ तालुक्यातील गावांनाही टंचाई जाणवू लागली आहे. ही टंचाई ऐन उन्हाळ्यात वेगाने वाढण्याची भीती आहे.

‘अल् निनो’च्या प्रभावाचा फटका मॉन्सूनला चांगलाच बसला. जुलै वगळता जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांत पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी झाला. परतीच्या पावसानेही निराशा केली. मध्यंतरी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्यामुळे टंचाईत काही फरक पडला नाही.

६३ प्रकल्प अर्धेच भरले

जिल्ह्यात ८३ प्रकल्प आहेत. पाच मध्यम, तर ७८ लघु प्रकल्प आहेत. जानेवारीअखेर ६३ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून कमी पाणी आहे. १७ प्रकल्प कोरडे, तर ११ प्रकल्पांत केवळ मृत पाणीसाठा आहे. बहुतांश प्रकल्प जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात आहेत. जत तालुक्यात ११ प्रकल्प कोरडे, तर ४ मध्ये मृत पाणीसाठा आहे. २० प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक पाणी आहे. १० प्रकल्प जत तालुक्यातील आहेत. दुष्काळी तालुक्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा घटला आहे.

दृष्टिक्षेपात

  • पूर्ण भरलेले प्रकल्प : ०

  • ५० टक्क्यांहून अधिक : २०

  • ५० टक्क्यांहून कमी : ६३

  • पाच मध्यम प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठा (गतवर्षी ७० टक्के)

  • ७८ लघु प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा (गतवर्षी ६५ टक्के)

तालुकानिहाय प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (आकडे दशलक्ष घनफूटमध्ये)

तालुका संख्या एकूण साठा उपयुक्त साठा टक्के (गतवर्षीची)

तासगाव ७ ७०८.९९ १०४.१७ १८ (७६)

खानापूर ८ ६६३.०४ १०१.५६ १९ (६२)

कडेगाव ७ ७६४.५० २९१.८२ ४६ (५२)

शिराळा ५ १०७१.३२ ४०६.५० ४६ (६०)

आटपाडी १३ १३६७.३६ ५६४.६७ ४९ (८१)

जत २७ ३६२८.४७ ५२९.१२ १८ (६२)

कवठेमहांकाळ ११ ९५६.५० १५९.६४ १९ (७५)

मिरज ३ १४१.६५ ३०.२६ २५ (५२)

वाळवा २ ५१.७३ १०.९१ २३ (४५)

एकूण ८३ ९४४०.२० २१९८.६५ २८ (६५)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT