st bus.png 
पश्चिम महाराष्ट्र

"एसटी' च्या या विभागाला 30 कोटीचा फटका 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' मुळे "लॉकडाउन' आणि संचारबंदी लागू केल्यानंतर "एसटी' चे चाक फिरायचे थांबले असून दररोजचे 75 ते 80 लाखाचे उत्पन्न बुडत आहे. 14 मार्चपासून आजअखेर सांगली विभागाला तब्बल 30 कोटी 27 लाखाचा फटका बसला आहे. "भारमान वाढवा' अभियानामध्येच "कोरोना' ने एसटी चे चाक थांबवले असून प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 


गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या काळात एसटी च्या सांगली विभागाला कोट्यवधी रूपयांचा फटका बसला होता. तसेच अनेक आगारात पुराचे पाणी गेल्यामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. महापुरानंतर एसटी सावरली जात होती. एसटी ला प्रचंड तोटा होत असल्यामुळे संपूर्ण राज्यात "भारमान वाढवा' अभियान सुरू करण्याचे आदेश दिले होते. एक मार्च ते 30 एप्रिल या दोन महिन्याच्या कालावधीत अभियान राबवले जाणार होते. त्यासाठी चालक-वाहक यांचे प्रबोधन केले होते. प्रवाशाने हात केल्यानंतर एसटी थांबत होती. 


परंतू अभियानाच्या दुसऱ्या आठवड्यातच "कोरोना' चे संकट राज्यात आले. त्याचा प्रसार रोखण्यासाठी 14 मार्चला राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा-महाविद्यालये बंदमुळे एसटीने अनेक ठिकाणच्या फेऱ्या 14 मार्चपासून बंद केल्या. हळूहळू बंद फेऱ्यांची संख्या वाढत गेली. "लॉकडाउन' ची घोषणा झाल्यानंतर 24 मार्चपासून रोजच्या 6036 फेऱ्या बंद झाल्या. सांगली विभागातून दररोज दोन लाख 71 हजार किलोमीटर धावणाऱ्या एसटीची चाके थांबली. रोजचे 75 ते 80 लाखाचे उत्पन्न थांबले. 


14 मार्चपासून 23 एप्रिलपर्यंतची आकडेवारी पाहिली तर आजअखेर 2 लाख 25 हजार 741 फेऱ्या थांबल्या आहेत. त्यामुळे एक कोटी एक लाख 95 हजार किलोमीटरचे अंतर कापले गेले नाही. त्याचा परिणाम म्हणून 30 कोटी 27 लाख 65 हजार रूपयाचे उत्पन्न बुडाले आहे. "एसटी' चे चाक जागेवर थांबल्यामुळे पुन्हा एकदा एसटी तोट्यात गेली आहे. "लॉकडाउन' उठल्यानंतरही एसटीला तोटा घेऊनच धावावे लागणार आहे. 
देखभाल-दुरूस्तीचा खर्च- 
एसटीचे चाक थांबल्यामुळे प्रत्येक आगारात पाच टक्केहून कमी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात आली आहे. वर्कशॉपमध्ये दोन शिफ्टमध्ये चार-चार कर्मचारी काम करत आहे. एसटी जागेवर थांबून राहिली तर देखभाल दुरूस्तीचा खर्च वाढतो. त्यामुळे दररोज गाड्या सुरू करून बॅटरी चार्ज करावी लागते. वाहकांच्या तिकिट काढण्याच्या मशिनची बॅटरी तपासून पाहावी लागत आहे. 
....................  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT