raigad labour.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकात अडकलेल्या रायगडच्या 329 मजूरांना पाठविले स्वगृही 

सकाळवृत्तसेवा

म्हैसाळ (सांगली)- कर्नाटक राज्यातील सत्ती (जि.बेळगाव) येथे रायगड जिल्ह्यातील बाभळीच्या लाकडाचा कोळसा तयार करणाऱ्या कामावर असलेले मजूर घराच्या ओढीने पायी प्रवास करीत म्हैसाळ ( ता.मिरज ) येथील चेक पोस्ट पर्यंत आलेले होते. या सर्व मजूरांना त्यांच्या घरी जाता यावे यासाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसिलदार रणजित देसाई यांनी पुढाकार घेत त्यांना चंदर गाव आणि ठाणाले ( ता.सुधागड पाली जि.रायगड ) येथे बसने रवाना केले. 

रायगड जिल्ह्यातील चंदर गाव,ठाणाले,पेडली,खानकोली,वाघोशी,उदर, 
मुळशी,वऱ्हाड आणि हातोंड आदि गावातील आदिवासी जमाती मधील बहुतांश मजूर आपल्या कुटुंबाला घेऊन कर्नाटकात बाभळीच्या लाकडापासून कोळसा तयार करण्यासाठी जातात.कर्नाटकातील दुष्काळी भागात पाण्याअभावी पडून राहिलेल्या शेतीत येड्या बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.त्यापासून कोळसा तयार करण्याच्या व्यवसाय तेथे सुरू असतो.हा व्यवसाय बीड, अहमदनगर जिल्ह्यातील कंत्राटदार रायगड जिल्ह्यातील मजुरांना घेऊन करीत असतात.

लॉक डाऊनच्या काळात कर्नाटक राज्य सरकारने या मजूरांना सहकार्य केले नसल्याचा त्यांचा आरोप आहे.यातूनचे त्यांनी आपल्या गावी पायीच जाण्याचा निर्णय घेतला.पायी प्रवास करत ते म्हैसाळ चेक पोस्ट पर्यंत आल्यानंतर त्यांची समस्या मिरजेचे प्रांताधिकारी श्री.शिंगटे आणि तहसिलदार श्री.देसाई यांनी सोडविली.म्हैसाळचे तलाठी एस.के.कणके, वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदू खंदारे यांनीही परिश्रम घेतले. 


कर्नाटकातून गेल्या दहा दिवसांत तिनशे चौऱ्यांऐशी मजूरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे.यातील 55 मजूरांना झारखंड राज्यात पाठविणेत आले.जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आणि राज्याच्या परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाचे सहकार्य मिळाले. 
- समीर शिंगटे, प्रांताधिकारी मिरज. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT