strike.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

देशव्यापी संपात सांगली जिल्ह्यातील 35 हजार  कर्मचारी सहभागी होणार...खासगीकरण व कंत्राटीकरण विरोधात 26 रोजी संप 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  सरकारी योजनांचे कंत्राटीकरण आणि खासगीकरणाच्या धोरणास तीव्र विरोध करण्यासाठी देशपातळीवरील दहा प्रमुख संघटनांनी 26 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. देशातील 80 लाख, राज्यातील 17 लाख कर्मचारी सहभागी होतील. संपात सांगली जिल्ह्यातील 35 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे विभाग सचिव पी. एन. काळे, जिल्हाध्यक्ष जे. के. महाडिक आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ""कामगार आणि श्रमिकांच्या कायद्यात हानीकारक बदल करून त्यांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारी योजनांचे कंत्राटीकरण आणि खासगीकरण करून सेवा देण्याचा घाट घातला जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार झपाट्याने कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी नियुक्त करत आहे. त्यामुळे या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी देशातील 10 प्रमुख संघटनांनी 26 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्यातील 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होतील. सांगली जिल्ह्यातील देखील सरकारी, निमसरकारी असे 35 हजार कर्मचारी संपात सहभागी होतील. या दिवशी प्रत्येक कार्यालयासमोर सकाळी 11 ते 2 या वेळेत निदर्शने होतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साडे बारा वाजता निदर्शने केली जातील.'' 

ते पुढे म्हणाले, ""देशव्यापी संपाच्या निमित्ताने विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये जूनी पेन्शन योजना लागू करा. खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करून अंशकालीन व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा. मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे धोरण रद्द करा. कामगारांना देशोधडीला लावणारे नवीन कायदे रद्द करा. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना द्या. सर्व संवर्गातील रिक्तपदे तत्काळ भरा. चतुर्थश्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्‍न तत्काळ सोडवा. वेतनश्रेणी त्रुटी दूर करा. अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करा. बेरोजगार भत्ता मंजूर करा. मनरेगामार्फत किमान दोनशे दिवसाचा रोजगार द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.'' 
कार्याध्यक्ष डी.जी. मुलाणी, एस.एच. सूर्यवंशी, संजय व्हनमाने, गणेश धुमाळ, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र पेंडूरकर आदी यावेळी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT