363 new patients in Sangli district; Five dead, 214 coronated 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात नवे 363 रुग्ण; पाचजणांचा मृत्यू , 214 कोरोनामुक्त 

घनशाम नवाथे

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचणीत 363 कोरोना बाधित आढळले. दिवसभरात 214 जण कोरोनामुक्त झाले. तर आज पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 


जिल्ह्यात मार्चपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दररोजच्या रुग्णसंख्येने चारशेपर्यंतचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती पसरली आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचीच स्थिती आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीत 2070 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 135 जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 1535 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 233 जण बाधित आढळले. दोन्ही चाचण्यात 368 जण बाधित आढळले. त्यापैकी 363 जण जिल्ह्यातील असून पाचजण परजिल्ह्यातील आहेत. 


जिल्ह्यात आज आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक 64 रुग्ण आढळले. तसेच जत तालुका 36, कडेगाव 21, कवठेमहांकाळ 18, खानापूर 29, मिरज 31, पलूस 10, शिराळा 30, तासगाव 11, वाळवा 54 याप्रमाणे रुग्ण निष्पन्न झाले. तर महापालिका क्षेत्रात 59 रुग्ण आढळले. त्यापैकी 34 सांगलीतील व 25 मिरजेतील आहेत. 


जिल्ह्यात आज दिवसभरात 214 जण कोरोनामुक्त झाले. तर पाचजणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघे मिरजेतील, कवठेमहांकाळ, मिरज व शिराळा तालुक्‍यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या 3385 रुग्णांपैकी 450 जण चिंताजनक आहेत. चिंताजनक रुग्णांपैकी 408 जण ऑक्‍सिजनवर आणि 42 जण व्हेंटीलेटरवर आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेर बाधित रुग्ण - 54656 
  • आजअखेर कोरोनामुक्त - 49434 
  • आजअखेर मृत रुग्ण - 1837 
  • परजिल्ह्यातील मृत - 220 
  • ग्रामीण रुग्ण - 27953 
  • शहरी रुग्ण - 8210 
  • महापालिका क्षेत्र - 18493 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT