40 tonnes of ration stolen rice seized; warehouse sealed in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

तब्बल रेशनिंगचा 40 टन चोरीचा तांदुळ जप्त; सांगलीतील गोदामाला टाळे

बाळासाहेब गणे

तुंग (जि. सांगली ) : मिरज तालुक्‍यातील सलगरे येथून शिराळा येथे रेशनिंगचा तांदूळ घेऊन चाललेला ट्रक सांगली ग्रामीण पोलिसांनी लक्ष्मी फाट्यानजीक पकडला. ट्रकमध्ये तब्बल सहा लाख 2 हजार 100 रूपये किंमतीचा 20 टन 70 किलो तांदूळ आढळून आला. रमेश बाबू गुंडेवाडी (सलगरे), प्रकाश केरबा पाडुळे व विजय दत्तात्रय शिंदे (दोघेही हरीपूर) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी माहिती दिली, की मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास लक्ष्मी फाटा येथून ट्रकमधून रेशनिंगचे तांदूळ भरून जात असल्याची माहिती मिळाली होती. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करीत ट्रकची तपासणी केली. त्यावेळी 6 लाख किंमतीचा 20 टन रेशनिंगचा तांदूळ मिळून आला. जो शिराळा येथे नेण्यात येत होता.

हा माल शिराळा येथील रेशनिंग माल विकत घेणारे प्रवीण वीरभद्र कानकात्रे, संदीप वीरभद्र कांनकात्रे यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीअंती सिध्देश्वर राईस मिल (सांगली) येथे छापा टाकण्यात आला. मिलमाधील 12 लाख किमतीचा 40 टन तांदुळ जप्त केला. दोन दिवसाच्या कारवाईत 18 लाखांचा 60 टन तांदूळ जप्त करत मोठी कारवाई केली. अनेक मोठी धेंडे असण्याची शक्‍यता आहे. 

सलगरे येथील रमेश गुंडेवाडी याने बेकायदेशीरपणे तांदुळाचा साठा करून तो काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न होता. पाडूळे याच्या मालकीच्या ट्रकमधून तांदूळ शिराळ्याकडे नेण्यात येत होता. जीवनावश्‍यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर राईसमिल सांगलीचे गोदाम सिल करण्यात आले आहे. रेशनिंगचा तांदूळ कोठून येतो याबाबात तपास सुरू आहे. 

पोलिस अधिक्षिक दिक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलिस अधिक्षिक मनिषा डुबले, शहर विभागचे अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधिक्षिक नित्यानंद झा, उपनिरीक्षक सागर पाटील, संदीप मोरे, सचिन मोरे, शंतनू ढवळीकर, अविनाश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT