police action.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

दारू-जुगारावरील छाप्यात 43 जणांना अटक... आता पोलिस ठाणेस्तरावरही पथक कार्यरत 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र पथक कार्यरत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज देखील या पथकांनी दारू व जुगार अड्डयांवर छापे टाकले. जुगार व दारूच्या 42 केसेस करून 43 जणांना अटक केली. 

नूतन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात धडाकेबाज एंट्री करून अवैध व्यवसायांवर छापासत्र सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची पळताभुई थोडी झाली आहे. अधीक्षक गेडाम यांनी अवैध व्यवसाय मोडीत काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना स्वतंत्र पथके नियुक्त करण्यासाठी सूचना केल्या आहेत. तसेच केवळ गुन्हे अन्वेषणने नव्हेतर पोलिस ठाणे स्तरावर कारवाईसाठी पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात कारवाईसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत कारवाईचा धडाका सुरू आहे. 
पोलिस ठाण्यातील पथके आणि गुन्हे अन्वेषणच्या पथकानी दोन दिवसात जुगार अड्डयांवर छापे मारून 14 केसेस केल्या आहेत. त्यामध्ये 18 जणांना अटक करून त्यांच्याकडून रोख 25 हजार 687 आणि जुगार साहित्य, तीन दुचाकी, चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दारूच्या 25 केसेस करून 28 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 34 हजार 564 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या चार-पाच दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. 

कारवाई सुरूच राहणार- 
अवैध व्यवसायिकांविरूद्ध केलेल्या कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे. यापुढेही अवैध व्यवसायाविरूद्ध कारवाई सुरूच राहणार असून ते पूर्णपणे मोडीत काढले जातील असा इशारा अधीक्षक गेडाम यांनी दिला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT