439 patients of corona in two days in Sangli district; Seven deaths 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात दोन दिवसांत कोरोनाचे 439 रुग्ण; सात मृत्यू

विष्णू मोहिते

सांगली ः जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढ सुरूच आहे. रविवार (ता. 28) व सोमवार (ता. 29) या दोन दिवसांत 439 रुग्णांची भर पडली; तर सात जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 134 आहे. अद्यापही 156 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोना चाचण्यांची संख्या दोन्ही दिवसांत दोन हजार रुग्णांच्या आसपासच आहे. 


जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या कायम आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 439 ने वाढली आहे. त्यात रविवारी 224, तर सोमावरी 205 रुग्णांचा समावेश आहे. "आरटीपीसीआर'च्या रविवारी केलेल्या 1284 चाचण्यांमध्ये 184 जण; तर आजच्या 1125 मध्ये 145 जण पॉझिटिव्ह आढळले. तसेच अँटिजेनच्या रविवारी केलेल्या 865 चाचण्यांमध्ये 71 आणि आजच्या 724 मध्ये 59 जण पॉझिटिव्ह सापडले. रविवारी तिघांचा मृत्यू झाला. त्यात महापालिका, मिरज व वाळव्यातील एकाचा समावेश आहे; तर आज चौघांचा मृत्यू झाला. त्यात आटपाडी, मिरज, वाळवा व पलूस तालुक्‍यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात चिंताजनक रुग्णांची संख्या 156 आहे. 


जिल्ह्यात सोमवारी सर्वाधिक रुग्ण महापालिका हद्दीत 46, वाळवा तालुक्‍यात 32, जत, तासगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्‍यात प्रत्येकी 26 रुग्ण सापडले. आटपाडी, मिरज तालुक्‍यात प्रत्येकी 11, कवठेमहांकाळ 2 आणि शिराळा तालुक्‍यातील 6 जणांचा समावेश आहे. 


जिल्ह्यात सध्या उपचाराखालील 1914 रुग्ण आहेत. आजअखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 47 हजार 486 असून, मृतांची संख्या 1792 आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 51 हजार 192 इतकी झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 25 हजार 990 जण, शहरी भागातील 7 हजार 534; तर सांगली, मिरज, कुपवाड मनपा भागातील 17 हजार 568 रुग्णांचा समावेश आहे. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या (सोमवार अखेर) 

  •  आटपाडी-2764 
  •  जत- 2577 
  •  कडेगाव- 3119 
  •  कवठेमहांकाळ-2580 
  •  खानापूर- 3265 
  •  मिरज-4794 
  •  पलूस- 2713 
  •  शिराळा- 2391 
  •  तासगाव- 3589 
  •  वाळवा-5832 
  •  मनपा-17568 
  •  एकूण-51192 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT