police lock checking.JPG
police lock checking.JPG 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली परिसरातील 44 "स्पॉट' पोलिसांकडून "लॉक' 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' चा प्रसार रोखला जावा तसेच विनाकारण नागरिक रस्त्यावर येऊ नयेत यासाठी सांगलीतील खणभाग, गावभाग, संजयनगर, शिंदे मळा, अभयनगर, नवीन वसाहत आदी दाट लोकवस्तीचे 44 "स्पॉट' पोलिसांनी "लॉक' केले. "लॉक' केलेल्या भागात रहदारीसाठी केवळ एकच रस्ता खुला असेल. तेथे पोलिसांची करडी नजर असणार आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांना तेथून प्रवेश राहील. जवळपास निम्मी सांगली "लॉक' केल्यामुळे सांगलीत उलटसुलट चर्चा रंगली होती. मात्र पोलिसांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सायंकाळी "लॉक' केलेल्या भागाची पाहणी केली. 


"कोरोना' मुळे 3 मे पर्यंत "लॉक डाऊन' वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना संचारबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळून इतरांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद केली आहे. जिल्ह्याच्या सीमा देखील रोखण्यात आल्या आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या हुल्लडबाज तरूणांविरूद्ध जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांनी मोहिम उघडली आहे. आतापर्यंत हजारो दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मास्क न घालता फिरणाऱ्यांवर आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. तरी देखील अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. पोलिसांनी अडवले तर खोटी कारणे देऊन सुटका करून घेतात. 


रस्त्यावर विनाकारण होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस आता अधिक आक्रमक झाले आहेत. आज सकाळपासून शहर पोलिसांनी खणभाग आणि नळभागातील सर्व गल्ल्यांत प्रवेश होणारे मार्ग बॅरिकेटस्‌ लावून बंद केले. तसेच मारूती रस्ता, गावभाग अंकली रस्ता, टिळक चौकातून गावभागाकडे जाणारे रस्ते "बॅरिकेटस्‌' आणि बांबूच्या चिवाट्या लावून बंद करण्यात आले. संजयनगर पोलिसांनी संजयनगर परिसर, शिंदे मळा, मंगळवार बाजारजवळील नेहरूनगर, राम रहिम कॉलनी, अभयनगर येथील गल्ल्यांमध्ये जाणारे मार्ग बंद केले. विश्रामबाग पोलिसांनी नवीन वसाहत, भीमनगर परिसर "सील' केला. तसेच मीरा हौसिंग सोसायटी, संभाजी कॉलनी हा परिसर शनिवारपर्यंत "सील' केला जाईल. तसेच तिन्ही पोलिस ठाणे हद्दीतील दाट लोकवस्तीचे भाग "लॉक' करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. पोलिसांच्या या मोहिमेतून आज निम्मी सांगली "लॉक' झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे परिसरातील लाखो वाहने गल्ली बोळांमध्ये अडकून पडली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना बाहेर पडता येणार नाही. 
 

केवळ एकच रस्ता खुला- 
गावभागातील सर्व गल्ल्या बंद केल्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी हरिपूर रस्त्यावरील प्रशिक चौकातील एकच रस्ता खुला ठेवला आहे. खणभाग व नळभागातील सर्व गल्ल्या बंद केल्यानंतर केवळ पंचमुखी मारूती रस्त्यावरूनच आतमध्ये जाता येणार आहे. तशीच व्यवस्था इतरत्र सील केलेल्या भागामध्ये राहणार आहे. 
 

आयर्विन पुल बंद करणार- 
सांगलीवाडीहून सांगलीत येणाऱ्या नागरिकांसाठी आयर्विन पुल शनिवारपासून बंद करण्यात येणार आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी सांगलीत येण्यासाठी त्याना नवीन पुलावरूनच यावे लागेल. तेथेही पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. 
 

""कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 44 स्पॉट "लॉक' केले आहेत. अत्यावश्‍यक सेवा तेथे सुरू राहणार आहे. कोरोना बाबत कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सुरक्षेसाठी ही उपाययोजना केली आहे. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा.'' 
-पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT