497 new patients in Sangli district; 685 corona free 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात नवे 497 रूग्ण; 685 कोरोनामुक्त

घनशाम नवाथे

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या कोरोना निदान चाचणीमध्ये 497 नवे रूग्ण आढळले. त्यात महापालिका क्षेत्रातील 113, ग्रामीण भागातील 324 आणि शहरी भागातील 60 रूग्णांचा समावेश आहे. दिवसात 685 रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर आज जिल्ह्यातील 11 जणांचा मृत्यू झाला. 

पाच-सहा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होतानाचे चित्र असून त्यामुळे थोडासा दिलासा मिळत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत असल्याचे स्पष्ट झाले. आज दिवसात आरटीपीसीआर चाचणीत 1024 रूग्ण तपासले. त्यात 207 जण कोरोना बाधित आढळले. हे प्रमाण 20 टक्के इतके आहे.

आज ऍन्टीजेन चाचणीत 2038 रूग्ण तपासले असता त्यात 293 जण बाधित आढळले. हे प्रमाण 14 टक्के इतके आहे. दिवसात दोन्ही चाचणीत 500 जण बाधित आढळले. त्यापैकी 497 जिल्ह्यातील आहेत. उर्वरीत तिघेजण कोल्हापूर, मुंबई व पुणे येथील आहेत. तसेच 497 पैकी 113 महापालिका क्षेत्रातील असून त्यामध्ये सांगलीतील 65 आणि मिरजेतील 48 आहेत. तसेच ग्रामीण भागात आटपाडी तालुक्‍यात 25, जत 17, कडेगाव 50, कवठेमहांकाळ 23, खानापूर 47, मिरज 56, पलूस 15, शिराळा 16, तासगाव 49, वाळवा 86 याप्रमाणे रूग्ण आढळले. 

आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आटपाडी, जत, मिरज, शिराळा, तासगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एक, वाळवा तालुक्‍यातील तीन आणि महापालिका क्षेत्रातील तीन रूग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 922 रूग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 815 जण ऑक्‍सिजनवर असून 107 जण व्हेंटीलेटरवर आहेत. आज दिवसभरात 685 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यातील चित्र 

  • आजअखेर जिल्ह्यातील रूग्ण- 38125 
  • सध्या उपचार घेणारे रूग्ण- 6924 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 29817 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1384 
  • आजअखेर परजिल्ह्यातील मृत- 180 
  • पॉझिटीव्हपैकी चिंताजनक रूग्ण- 922 
  • आजअखेर ग्रामीण रूग्ण- 17529 
  • आजअखेर शहरी रूग्ण- 5712 
  • महापालिका क्षेत्रातील रूग्ण- 14884 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT