mohol police station pi

 

sakal

पश्चिम महाराष्ट्र

५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या! मोहोळचे पोलिस निरीक्षक हेंमत शेडगे यांची पुणे ग्रामीणला बदली, वाचा...

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेंमत शेडगे यांची बदली पुणे ग्रामीणला झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेंमत शेडगे यांची बदली पुणे ग्रामीणला झाली आहे. पण, अजून त्यांनी कार्यभार सोडला नसून लवकरच त्यांच्या ठिकाणी नवीन पोलिस निरीक्षक दिला जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस महानिरीक्षक श्री. फुलारी यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील गजानन सरगर यांची बदली सांगली, पुणे ग्रामीणचे अभिजित देशमुख यांची बदली सांगलीला, साताऱ्यातील राजेंद्र सावंत्रे यांची आणि सांगलीतील सतीश शिंदे यांची बदली कोल्हापूरला झाली आहे. बदली झालेल्या नि:शस्त्र पोलिस निरीक्षकांना तत्काळ बदलीचे आदेश पोचवून कार्यमुक्त करावे. त्यांच्या ठिकाणी पर्यायी किंवा बदलीवर येणाऱ्या नि:शस्त्र पोलिस निरीक्षकांची वाट पाहू नये, असेही आदेशात नमूद आहे. त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा. ज्या ठिकाणी बदली झाली तेथे कार्यमुक्तीनंतर रूजू न झाल्यास त्यांचा अहवाल पोलिस महासंचालकांना पाठवावा, असेही त्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. शेडगे यांच्या जागेवर आता कोणाची नेमणूक होणार, याकडे मोहोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती ऑडिओ क्लिप

गोतस्करी करणाऱ्या वाहनाची माहिती देणाऱ्या व्यक्तीची व पोलिस निरीक्षक शेडगे यांच्यातील ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. यात गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी देखील केली होती. दरम्यान, गोतस्करी प्रकरणात १३ जानेवारीलाच मोहोळ पोलिस ठाण्यात गोवंशाची अवैधपण तस्करी केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक देखील झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT