CORONA.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

दिवसभरात 529 कोरोनामुक्त : नवे 314 रूग्ण...जिल्ह्यातील 13 जणांचा मृत्यू 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या चाचण्यातून 314 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामध्ये सर्वाधिक 69 रूग्ण वाळवा तालुक्‍यातील आहेत. त्याखालोखाल महापालिका क्षेत्रात 47 रूग्ण आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील 13 जणांचा आणि परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर 529 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

गेल्या आठ दिवसापासून कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत असून सर्वांनाच दिलासा मिळू लागला आहे. आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यामध्ये 1345 रूग्ण तपासले. त्यामधये 90 जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. हे प्रमाण 7 टक्के इतके आहे. तर ऍन्टीजेन चाचण्यामध्ये 2295 रूग्ण तपासल्यानंतर 233 बाधित आढळले. हे प्रमाण 11 टक्के इतके आहे. दिवसभरात दोन्ही चाचण्यामध्ये 323 रूग्ण आढळले. त्यापैकी 314 जिल्ह्यातील आणि 9 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत. 

वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक 69 रूग्ण बाधित आढळले. तसेच आटपाडी तालुका 12, जत 29, कडेगाव 14, कवठेमहांकाळ 11, खानापूर 31, मिरज 31, पलूस 15, शिराळा 36, तासगाव 19 याप्रमाणे ग्रामीण भागात रूग्ण निष्पन्न झाले. तर महापालिका क्षेत्रातील 47 रूग्णांमध्ये सांगलीतील 34 आणि मिरजेतील 13 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 13 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मिरज तालुक्‍यातील 5, वाळवा व महापालिका क्षेत्र प्रत्येकी दोन, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यात प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. 
जिल्ह्यात आज दिवसभरात 529 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या 4831 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 3481 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. उर्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. तसेच सद्यस्थितीत 656 रूग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 581 रूग्ण ऑक्‍सिजनवर, 75 रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेरचे पॉझिटीव्ह रूग्ण- 40644 
  • सध्या उपचार घेणारे रूग्ण- 4831 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 34313 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1500 
  • आजअखेर परजिल्ह्यातील मृत- 189 
  • आजअखेर ग्रामीण रूग्ण- 19308 
  • आजअखेर शहरी रूग्ण- 6016 
  • महापालिका क्षेत्र रूग्ण- 15320 

कोरोना तालुकानिहाय- 
जिल्ह्यात आज दिवसभरात 314 नवे रूग्ण आढळले. त्यामध्ये वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक 69 रूग्ण आहेत. 

  • आटपाडी- 1838 
  • जत- 1579 
  • कडेगाव- 2298 
  • कवठेमहांकाळ- 2103 
  • खानापूर- 2116 
  • मिरज- 4002 
  • पलूस- 2273 
  • शिराळा- 1815 
  • तासगाव- 2652 
  • वाळवा- 4648 
  • महापालिका- 15320 
  • एकुण= 40644 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT