सांगली जिल्हा बँक
सांगली जिल्हा बँक sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा बँकेसाठी दुपारीच ५६ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज जिल्ह्यातील बारा ठिकाणी सकाळी ८ पासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. बँकेच्या निवडणुकीसाठी चुरसीने मतदान होत आहे. दुपारी १२ पर्यंत २५७३ पैकी १४३६ मतदारांनी मतदान केले होते. दुपारी १२ वाजताच ५६ टक्के मतदान झाल्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असे चित्र आहे. नेते मंडळींसह उमेदवार प्रत्येक केंद्रावर भेटी देऊन मतदानाची आकडेवारी घेत आहेत.

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी तीन जागावर महाआघाडीचे आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, महेंद्र लाड हे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत १८ जागांसाठी महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत लागली आहे. सहकार पॅनेलने १८ तर भाजपच्या शेतकरी पॅनेलने १६ उमेदवार रिंगणात उभे केलेत. तसेच १२ अपक्षही रिंगणात आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक प्रथमच पक्षीय पातळीवर होत आहे. त्यामुळे महाआघाडी आणि भाजप उमेदवारांमध्ये चुरस आहे. सोसायटी गटातील जत, आटपाडी, तासगाव आणि अन्य गटात चुरस निर्माण झाली आहे. क्रॉस व्होटींगची भिती असल्यामुळे उमेदवार दक्ष आहेत.जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एकुण २५७३ मतदार आहेत. मिरज आणि वाळवा तालुक्यात मात्र प्रत्येकी दोन मतदान केंद्रे तर अन्य तालुक्यात प्रत्येकी एक मतदान केंद्र आहे. दुपारी १२ पर्यंत २५७३ पैकी १४३६ मतदारांनी मतदान केले होते. ही टक्केवारी ५५.८१ टक्के इतकी होती. यामध्ये वाळवा, कडेगाव येथील केंद्रावर ७४ टक्के मतदान झाले होते. तसेच पलूसला ७३ टक्के, जतमध्ये ६९ टक्के, कवठेमहांकाळला ६७ टक्के मतदान झाले होते. दुपारीच ५५.८१ टक्के मतदान झाल्यामुळे सायंकाळपर्यंत मतदानाचा टक्का वाढेल असे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसचे राज्यमंत्री विश्‍वजीत कदम आदींसह भाजपचे नेते नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आदींसह उमेदवार मतदान केंद्रावर आहेत. सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ असून बुधवारी (23) मिरजेत शेतकरी भवनमध्ये मतमोजणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT