663 crore loan disbursement through Annasaheb Patil Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत 663 कोटींचे कर्जवाटप! 

विठ्ठल लांडगे

नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आजपर्यंत राज्यभरातून 12 हजार 901 लाभार्थींना व्यवसायासाठी कर्जप्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांच्यासाठी 663 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. महामंडळामार्फत विविध व्यवसायांसाठी कर्ज घेतलेल्या लाभार्थींचे तब्बल सहा हजार 675 लाभार्थींचे 26 कोटी रुपयांचे व्याज भरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नरेंद्र पाटलांचा पाठपुरावा 
मराठा आरक्षणासाठी राज्यभर क्रांती मोर्चे निघाल्यानंतर राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली. त्यातून मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्जासाठी मार्गदर्शन करण्याची व त्या कर्जापोटी तब्बल 12 टक्के व्याज-परतावा भरण्याची हमी घेण्यात आली. 21 सप्टेंबर 2018 रोजी ही योजना तयार झाली. सुरवातीच्या काळात बहुतांश प्रकरणे बॅंकांनी तारणाच्या मुद्द्यावर नाकारली. त्यात प्रस्ताव दाखल केल्यानंतर अनेकांनी पाठपुरावाच केला नसल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विशेष मोहीम उघडून, या योजनेतून लाभार्थींना तातडीने कर्जे मंजूर व्हावीत, यासाठी पाठपुरावा केला. त्यातून अनेक तरुणांची कर्जप्रकरणे मार्गी लागली. 

अशी आहे योजना..! 
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्यामार्फत बीजभांडवल कर्जयोजनेत दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेत महामंडळाकडून 35 टक्के रक्कम चार टक्के व्याजदराने देण्यात येते. पाच टक्के रक्कम उमेदवाराचा सहभाग व 60 टक्के रक्कम बॅंकेकडून बॅंकेच्या व्याजदराप्रमाणे देण्यात येते. कर्जफेडीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा, त्याचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे व 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा सहा लाखांपर्यंत आहे. 

राहुरी व नगरला कार्यशाळा..! 
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माहितीच्या प्रसाराकरिता मंडळातर्फे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येत्या गुरुवारी व शुक्रवारी (ता. 23 व 24) नगर जिल्ह्यात विशेष दौरा आयोजित केला आहे. त्यात गुरुवारी सकाळी अकरा वाजता राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे, राहाता, कोपरगाव व अकोले तालुक्‍यांतील तरुणांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर संत गाडगेबाबा शॉपिंग कॉम्प्लेक्‍समध्ये ही कार्यशाळा होईल. शुक्रवारी नगर, पारनेर, जामखेड, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदे तालुक्‍यांतील इच्छुकांसाठी स्टेशन रस्त्यावरील अक्षता गार्डनमध्ये दुपारी 12 वाजता ही कार्यशाळा होईल. दोन्ही ठिकाणच्या कार्यशाळांतून योजनेची व अपेक्षित कागदपत्रांची माहिती दिली जाणार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. 

सामान्यांपर्यंत लाभ पोचायला हवा 
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामान्य लाभार्थींपर्यंत पोचायला हवी. त्यासाठी विशेष जागृती मोहीम उघडली आहे. महामंडळामार्फतच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. योजना व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती या दौऱ्यातून दिली जाते, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT