1Corona_Danger_19 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकींग...परदेशातून आलेले 77 जण निरीक्षणाखाली 

सकाळवृत्तसेवा


सांगली: जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ग्रामीण 30 व शहरी 47 असे एकूण 77 प्रवासी आरोग्य विभागाच्या निरिक्षणाखाली असून यातील कोणालाही काही लक्षणे उदभवल्यास त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल. आरोग्य विभागाने जनजागृतीची मोहिम प्रभावीपणे राबवून कोरोना आजाराबद्दलचे सामान्य जनतेचे गैरसमज तात्काळ दूर करण्याचा प्रभावी प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजाराबाबत नियोजन व आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे उपस्थित होते. 

जादा संख्येने एकत्र लोक येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त लोकांना होण्याची शक्‍यता असते म्हणून सभा, समारंभ, संमेलन, शिबीर, कार्यशाळा, मेळावे, यात्रा, जत्रा, उरूस इत्यादी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. आयोजकांनी असे सर्व कार्यक्रम तात्पुरते स्थगीत करण्याबाबतच्या यापूर्वी दिलेल्या सूचना दिल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. 
ते म्हणाले,""परदेश दौरा करून आलेले व ताप, खोकला अशी लक्षण असलेल्या रूग्णांची माहिती ताबडतोब नियंत्रण कक्षाला येईल व अशी कोणतीही व्यक्ती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. ज्यांचा गृह अलगीकरण (होम क्वॉरंटाईन) चालू आहे त्या त्या संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी प्रवाशावर लक्ष व ते घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.'' 

अन्यथा कारवाई ः डॉ. चौधरी 
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ""कोरोनाबाबत सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची अफवा किंवा एखादी विपर्यस्त पोस्ट पसरवली जात असेल तर करोना नियंत्रण कक्षाने त्याची दखल घेवून पोलिस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. मास्क, सॅनिटायझर याची विक्री "एमआरपी'नेच करण्यात यावी. अप्रमाणित वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन मिळेल असे कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही. अन्यथा कारवाई केली जाईल.  

येथील शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दोघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांचे "स्वॅप'चे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Yoga for Diabetes: काही मिनिटांचं मंडूकासन अन् शरीराला मिळतील ‘हे’ फायदे! जाणून घ्या डायबिटीसवर कसं आहे प्रभावी

SCROLL FOR NEXT