Tembhu scheme Sakal
पश्चिम महाराष्ट्र

‘टेंभू’ला अडीच वर्षांत ८८० कोटी

‘जलसंपदा’ची यादी समोर; अनिल बाबर यांच्या बंडामागे स्थानिक राजकारण?

सकाळ वृत्तसेवा

सांगली - राज्यातील सत्तानाट्यात खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर सहभागी झाले आहे. त्यांनी हे बंड राजकीय स्वार्थासाठी नव्हे, तर टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी केल्याचे म्हटले आहे. त्यावर राष्ट्रावादीने गेल्या अडीच वर्षांत टेंभू योजनेवर झालेला खर्च, त्याची मंजुरी, मान्यता याचा आलेख समोर ठेवला आहे. त्यानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेसाठी ८८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कोयना धरणातील आठ टीएमसी अतिरिक्त पाणी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

आमदार अनिल बाबर यांना टेंभू योजनेचे जनक मानले जाते. या योजनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी संघर्ष केल्याचे मान्यही केले जाते. परंतु, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जात शिवसेनेविरुद्ध बंड करताना ‘टेंभू’चा दाखला दिल्याने वाद पेटला आहे. विट्यातील राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनी ‘टेंभू’चे कारण हे नाटक असल्याची टीका केली आहे. आता जलसंपदा विभागाची माहिती चित्र स्पष्ट करणारी आहे.

टेंभू योजनेला ४ हजार ८८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आहे. पैकी ३१ मार्च २०२१ अखेर २ हजार ७५८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी २२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेत या योजनेला गती देण्याबाबत आमदार अनिल बाबर यांनी प्रश्‍न मांडला होता. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, ‘आमदार अनिल बाबर यांना पुन्हा या प्रश्‍नावर विधानसभेत बोलण्याची गरज लागणार नाही,’ अशी ग्वाही दिली होती.

आमदार बाबर यांच्या बंडामागे ‘टेंभू’पेक्षा खानापूर-आटपाडी मतदार संघातील त्यांची राजकीय कोंडी हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. त्यांचे प्रमुख विरोधक, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना जयंत पाटील यांना पाठबळ दिले. सोबतच, जयंतरावांनी आटपाडीतील प्रमुख नेते, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनाही गळ टाकून ठेवला. ही बेरीज झाली तर भविष्यात बाबर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे. महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाला गेली तरी बंड ठरलेले आहे. अशावेळी पक्ष-अपक्षांपेक्षा बाबर विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची रसद हीच बाबर यांच्या मनातील खदखद होती, असे राजकीय जाणकार सांगतात.

सर्वाधिक निधी ‘टेंभू’ला

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील विविध उपसा सिंचन योजनांच्या निधीचा तक्ता समोर आला आहे. त्यात सर्वाधिक २२० कोटी रुपयांचा निधी टेंभू योजनेला मंजूर आहे. अर्थात, या निधीवरून बाबर आणि राष्ट्रवादीत; एवढेच काय, भाजप खासदार संजय पाटील यांच्यातही श्रेयवाद रंगलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवासी बेपत्ता, मानव तस्करीचा उलगडा, दमछाक होऊन अनेकांचा मृत्यू

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Chandrakant Patil : सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे हे भाजपचे कर्तव्य आहे

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

SCROLL FOR NEXT