Milk Producing Farmers
Milk Producing Farmers esakal
पश्चिम महाराष्ट्र

Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तब्बल 9 कोटी 50 लाख रुपये; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पोपट पाटील

संबंधित संस्थेने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर दुधाला २७ रुपये जमा केले की, शासन ५ रुपयाचे अनुदान देणार आहे.

इस्लामपूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदानासाठी (Milk Subsidy) सांगली जिल्ह्यातील दूध संकलन संस्थांमार्फत ७९ हजार ३६२ प्रस्ताव आले होते. त्या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांच्या (Farmers) बँक खात्यावर (Bank Account) ९ कोटी ५० लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी नामदेव दवडते यांनी दिली.

या अनुदान योजनेनुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावराच्या टॅगिंग व आनुवंशिकतेविषयी शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक आहे. संबंधित संस्थेने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर दुधाला २७ रुपये जमा केले की, शासन ५ रुपयाचे अनुदान देणार आहे. त्यानुसार खासगी व सहकारी संस्थांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे.

दाखल प्रस्तावांची छाननी सुरू असून ती पूर्ण होताच पुढील आठवड्यात आणखी अनुदान वितरित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनावरांच्या टॅगिंगसह आनुवंशिक माहिती वेळेवर ऑनलाइन भरण्याचे प्रमाण सुरवातीस कमी होते. दूध संस्थांच्या मागणीचा जाणीवपूर्वक विचार करून दुग्ध व्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंढे यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय आणि आयुक्तालयात परिपूर्ण प्रस्तावांची संख्या वाढली.

छाननीअंती अशा प्रस्तावांची मंजुरी मिळाल्याने थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वितरित होऊ लागले आहे. दूध अनुदान योजनेंतर्गत ११ जानेवारी ते १० मार्चपर्यंतच्या कालावधीत दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच २६ मार्चपर्यंत ज्या जनावरांची पडताळणी झालेली असेल, त्यांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.

अपूर्ण प्रस्तावांचा फटका

वाळवा तालुक्यातील हुतात्मा सहकारी दूध संघाने परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. त्यामुळे त्या संबंधित दूध उत्पादक शेतकरी शासनाच्या दूध अनुदानापासून वंचित राहणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये प्रथमच थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान देण्याची योजना दुग्ध व्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंढे यांनी विशेष संगणक प्रणालीमार्फत राबवलेली आहे. त्याचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना झालेला आहे. पॅकिंग आणि फार्मर आयडीमुळे यापुढे भविष्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येईल.

-प्रशांत मोहोड, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त, मुंबई

दृष्टिक्षेपात...

सांगली जिल्ह्यातून दूध अनुदानासाठी आलेले प्रस्ताव - ७९ हजार ३६२

दाखल केलेल्या प्रस्तावाकरिता जमा अनुदान - ९ कोटी ५० लाख रुपये

प्रकल्पनिहाय अनुदान

  • चितळे डेअरी भिलवडी - ६ कोटी रुपये

  • राजारामबापू पाटील दूध संघ, इस्लामपूर - १ कोटी ६५ लाख रुपये

  • हेमंतबाबा देशमुख दूध प्रकल्प, आटपाडी - ६८ लाख रुपये

  • अग्रणी दूध प्रकल्प मांजर्डे - ६३ लाख रुपये

  • श्रीनिवासा मिल्क, मिरज - ४० लाख रुपये

  • छोटे ७ प्रकल्प - १४ लाख रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT