SLA20A03315.jpeg
SLA20A03315.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

16 वर्षात 9 बिबट्यांचा मृत्यू ; शिराळा, वाळवा तालुक्‍यातील घटना 

शिवाजीराव चौगुले


शिराळा (सांगली) : अन्नाच्या शोधात बाहेर पडलेल्या बिबट्यांचा मृत्यू आता नित्याच्या व सवयीचा भाग झालेल्या घटना आहेत. शिराळा तालुक्‍यात आत्तापर्यंत आठ व वाळवा तालुक्‍यात असे 16 वर्षात 9 बिबटे मृत्यूमुखी पडले. त्यापैकी उद्यानात नेत असताना दोन तर उद्यान बाहेर सात बिबट्यांचा मृत्यू झाला. उद्यानाबाहेर बिबट्यांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचा वावर हा कायमचाच आहे. काही बिबटे अन्नाच्या शोधत बाहेर पडले ते बाहेच राहिले. त्यांचा वावर चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून 60 किलोमीटर अंतरापर्यंत आहे. शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असल्याने बिबट्याला राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. परंतु काहीवेळा त्यांना पुरेशे अन्न मिळत नसल्याने त्यांनी मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे मांगरूळ, बिळाशी, वाकुर्डे, येळापुर, कुसाईवाडी, मांगले, मिरखेवाडी, बेरडेवाडी, कांदे, शिंगटेवाडी परिसरातील वस्त्यांवर, माणसांवर पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले. प्राण्यांना तर बिबट्यांनी ठारच मारले. शेडगेवाडी-खुजगाव दरम्यान असलेल्या वारणा जलसेतू वरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता. 

14 सप्टेंबर 2004 खेड तालुक्‍यातील आयनीमेटा येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी आणलेल्या नर जातीच्या बिबट्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला होता. त्यापूर्वी चव्हाणवाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. 
सन 2016 मध्ये वाकाईवाडी येथे दोन तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकरवाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. 1 जानेवारी 2015 रोजी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेलेल्या बिबट्याला चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. 

एक वर्षांपूर्वी येडेनिपाणी व शेडगेवाडी येथे बिबट्याचा मृत्यू झाला होता. तीन दिवसांपूर्वी वाकुर्डे बुद्रुक येथे बिबट्याच्या बछड्याचा वाहन अपघातात मृत्य झाला. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT