boat 
पश्चिम महाराष्ट्र

क्षमता पंधराची, बसले बत्तीसजण अन् मग...

सकाळ वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे ग्रामपंचायतीची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह हाती आले असून, 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आणखी 3 जणांना बुड़ाल्याची शक्यता असून बेपत्ता आहेत. शोधकार्य सुरू आहे. एनडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचली आहे. बोटमध्ये एकूण 30 लोक होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनकडून देण्यात आली.

सुमारे पंधराजणांची क्षमता असणाऱ्या बोटीमध्ये तब्बल 32 जण बसले आणि तेथेच घात झाला. अवघ्या काही मीटर अंतरावर बोट गेली आणि क्षणार्धात उलटली. पाहाता-पाहता तिने तळ गाठला. काठावरच्या गर्दीत हल्लकल्लोळ माजला. तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुरात उड्या घेतल्या. हाताला लागतील त्यांना खेचून पाण्याबाहेर काढले. सुमारे पंधराजणांचे प्राण वाचवण्यात यश आले.

ब्रह्मनाळ (ता. पलूस ) येथे सकाळी सव्वानऊ वाजता घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना. पाण्यात पडताच गुदमरुन मरण पावलेल्या महिलांचे मृतदेह शेतात चिखलातच ठेवण्याचा करुण प्रसंग ग्रामस्थांवर ओढवला. शेतकरी संंघटनेचे शीतल राजोबा यांनी घटनेविषयी माहीती दिली. नदीच्या बॅक वॉटरमध्ये गाव येत असल्याने शासकीय बोट मिळाली नसल्याचे ते म्हणाले. पुराचे पाणी वाढत असल्याने लोकांना गावाबाहेर काढण्याचे काम दोन दिवसांपासूनच सुरु होते. बोटी कमी पडत असल्याने काहीलींचाही वापर सुरु होता. मिळेल त्या मार्गाने व साधनांची मदत घेऊन ग्रामस्थ सुरक्षित जागा गाठत होते.

उलटलेल्या बोटीत महिलांची संख्या जास्त होती. बाहेर काढलेल्या मृतदेहांकडे पाहून ग्रामस्थांनी अश्रूंचे बांध वाहीले. अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला कवटाळून एका महिलेने प्राण सोडले. बाळाला वाचवण्यासाठीची तिची प्राणांतिक धडपड दोघांच्याही मृत्यूजवळच थांबली. तिचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा बाळला कवटाळलेल्या अवस्थेतच होता. शांत झोपलेल्या चेहऱ्याचे बाळ पाहणाऱ्याच्या मनात कालवाकालव करणारे ठरले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT