Chandrakant shendarkar selected for Nasa's project sakal
पश्चिम महाराष्ट्र

Nasa: आजरा तालुक्यातील शेतकरी पुत्राची नासापर्यंत झेप, ढगांवरील संशोधन प्रकल्पासाठी हाॅवर्ड विद्यापीठातून निवड

A boy from an ordinary farming family selected for NASA's project: ढगांवरील संशोधन प्रकल्पासाठी हाॅवर्ड विद्यापीठातून चंद्रकांतची नासाच्या प्रकल्पासाठी निवड झाली.

सकाळ डिजिटल टीम

Ajara: किणे (ता. आजरा) येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण अमेरिकेतील नासापर्यंत पोहोचला आहे. हाॅवर्ड विद्यापीठातून त्यांची नासाच्या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. आजरा तालुक्यातील किणेसारख्या ग्रामीण भागातील चंद्रकांत शेंदरकर यांनी घेतलेली ही झेप कौतुकाचा विषय ठरली आहे. जिद्द, चिकाटी, कष्ट याच्या जोरावर त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे. ते, नासासाठी ढगांवरील संशोधन प्रकल्प करणार आहेत.

शेंदरकर यांचा जन्म किणे येथील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण दादर (मुंबई) मधील सानेगुरुजी विद्यालयात झाले. बारावीतील गुणांवर त्यांची आयआयटी निवड झाली. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांना तेथेपर्यंत जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी आजरा महाविद्यालयामध्ये गणित विषय घेऊन बी.एस्सी. पूर्ण केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये गणितामध्ये एम.एस्सी. केले.

पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी मुंबईमध्ये नोकरी करीत ‘सीडॅक’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर एमआयटीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सीटी बॅंकेमध्ये काही काळ नोकरी केल्यावर सध्या ते जेपी मॉर्गन बॅंकेत अधिकारी पदावर काम करीत आहेत. बॅंकेत काम करताना त्यांनी हाॅवर्ड विद्यापीठातून डेटा सायन्स (एम. एल.) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर ते, हॉवर्डमध्ये शिक्षण घेत आहेत.

नासाच्या या प्रकल्पासाठी चौघांची निवड झाली आहेत. त्यात दोन भारतीय आहेत. त्यापैकी एक शेंदरकर आहेत. ढगांवर अभ्यास व संशोधन प्रकल्प नासा या संस्थेसाठी करणार आहेत. आर्थिक अडचणींचा कोणताही बाऊ न करता त्यांनी आपले ध्येय गाठले आहे. त्यांच्या जडणघडणीमध्ये आई, वडील, पत्नी व भाऊ यांचे पाठबळ आहे

"गणित हा माझा लहानपणापासून आवडता विषय आहे. त्यात करिअर करण्याची संधी मिळाली. यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील नासा या संस्थेत संशोधन व अभ्यासाची संधी मिळाली, याचे वेगळे समाधान आहे."

- चंद्रकांत शेंदरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT