पश्चिम महाराष्ट्र

जिगरबाज युवकानं कोरोनाला हरवलं, पण...

सकाळ डिजिटल टीम

सांगली : तो गेली काही वर्षे अंथरुणाला खिळला होता. कुठलीच हालचाल नाही, कूस बदलायची तरी आईची मदत घ्यावी लागायची. दुर्मिळ अशा डीएमडी आजाराने त्याला ग्रासले होते. त्यातून तो लढत होता, शिकत होता, शाळेत नंबर मिळवत होता. कोरोनाने अनेक मजबूत लोकांना हादरून सोडले, याने मात्र त्यावर मात केली; पण, नियतीपुढे तो हरला. दुर्मिळ आजारापुढे त्याची जगण्याची उमेद कमी पडली. आदित्य बाळू गायकवाड या वीस वर्षीय तरुणाचे निधन अनेकांना हुरहूर लावून गेले.

येथील पंचशीलनगर येथील गायकवाड कुटुंबातील हा मोठा मुलगा. मिरज तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळू गायकवाड आणि यशवंतनगर शाळेच्या शिक्षिका स्वाती ओंकारे (गायकवाड) यांचा मुलगा. आजाराने त्याला उठता-बसता येत नव्हते. त्यातून तो अभ्यास करायचा. दहावीला त्याने दणदणीत यश मिळवले आणि बारावीला तर वर्गात पहिला आला. त्याला जिंकायचे होते, लढायचे होते. त्याच्या हाता पायाची हालचाल होत नव्हती. मानही हलवता येत नव्हती. आई, वडील, भाऊ अभिषेक यांनी त्याचे सगळे केले. दिवस रात्र जागून त्याची सेवा केली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तो बाधित झाला. वडील, भाऊही बाधित होते. मात्र आदित्यचं काय? त्याची ऑक्सिजन लेवल ७० पर्यंत खाली आली होती, मात्र त्याने दवाखान्यात जायला नकार दिला. ‘मी दवाखान्यात गेलो तर परत येणार नाही’ असे म्हणत हमसून रडला. त्याला घरी ठेवले गेले. आईने त्याची सगळी सेवा केली. कोरोनाची भीती न बाळगता त्या मुलासाठी राबल्या. त्याही बाधित झाल्या, मात्र मुलाला कोरोनामुक्त केलं. त्याला वाचवल्याचा आनंद अपार होता.

आदित्य वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत चपळ होता. खेळात, अभ्यासात वेग होता. त्याला हजारो मुलांमध्ये एखाद्याला होणारा डीएमडी आजार झाला. इयत्ता पाचवीत असताना तो चालायचा बंद झाला. पायापासून हळूहळू त्याचे अवयव निकामे होत गेले. सगळे उपाय झाले, मात्र उपयोग झाला नाही. त्याची इच्छाशक्ती त्याला पुढे नेत राहिली. पण, नियतीने त्यावर मात केली. आदित्यने अखेरचा श्‍वास घेतला आणि एका जिगरबाज युवकाच्या लढाईचा शेवट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT