Abhishek of sewage in front of Sangli Municipality; Nationalist movement 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली पालिकेसमोर सांडपाण्याचा अभिषेक; राष्ट्रवादीचे आंदोलन

सकाळवृत्तसेवा

सांगली ः विश्रामबाग परिसरात सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्थाच नसल्याने सर्वत्र पाण्याची तळी निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेच्या दारात सांडपाण्याचा अभिषेक घालून आंदोलन झाले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. 

दरम्यान, भाजपाचे नगरसेवक शेखर इनामदार यांनी या भागाची पाहणी करुन तत्काळ उपाययोजना करू, अशी ग्वाही यावेळी दिली. पोलिसांनी विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी ताब्यात घेऊन आंदोलकांना सोडून दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा महावितरण कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालये आहेत. पाणीपट्टी, घरपट्टी यासह सर्व कराची 99 टक्के वसुली या परिसरात होते. एक सुनियोजित शहर म्हणून निर्मिती करण्यात आलेल्या विश्रामबाग परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागते आहे. भागात सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था नसल्याने जागोजागी पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे भागात सांडपाण्याची मोठी तळी निर्माण झाली आहे. यामुळे डेंगी, चिकनगुनिया सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. घरटी एक रुग्ण अशी अवस्था या परिसराची झाली. 

याबाबत निवेदने देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गायकवाड यांनी आज पालिकेच्या दारात अगदी विधीवत सोहळे नेसून सांडपाण्याचा अभिषेक घातला. यावेळी पसिरातील नागरिकही उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT