JAAYANT PAATIL 
पश्चिम महाराष्ट्र

विदेशातून आलेल्यांबाबत जयंत पाटील म्हणाले...

सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यात 191 प्रवासी परदेश वारी करून आले आहेत. यातील 11 प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांचे स्वॅब निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडले आहे. उर्वरित 180 प्रवाशांना होम क्वॉरंटाईन (घरीच विलगीकरण कक्षात) ठेवले आहे. ज्यांनी 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण होईपर्यंत अजिबात घराबाहेर पडू नये.

या कालावधीमध्ये घराबाहेर फिरताना आढळल्यास प्रशासनातर्फे सोय करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सक्तीने ठेवण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी होम क्वॉरंटाईनची अतिशय कडक व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, परदेशातून आलेले प्रवासी घरी आहेत किंवा नाहीत याची दर दोन तासाने प्रशासकीय यंत्रणेने तपासणी करावी. ही संख्या वाढल्यास आयसोलेशन कक्षात ठेवण्यासाठी वाढीव बेडची तजवीज करावी. सभा, मेळावे, जत्रा, उरूस, गर्दी जमवणारे अन्य कार्यक्रम यांना 31 मार्च पर्यंत स्थगीती देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, जनावरांचे आठवडे बाजार हे देखील 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहेत. जनतेनेही सर्व उपाययोजनांसाठी सहकार्य करावे. अनावश्‍यक धाडस करू नये.

कोरोना हा विषय गांभीर्याने घ्यावा. शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये यांना सुट्ट्या देण्यात आल्या असल्या तरी बाहेर फिरायला जावयाचे नियोजन करू नये, घरीच रहावे. स्वत:मध्ये काही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT