Sangli Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'कडून कॅफेची तोडफोड

पीडित युवती सांगलीतील एका महाविद्यालयात (College) शिक्षण घेते. काही महिन्यांपूर्वी संशयित आशिषसमवेत तिची ओळख झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

पीडित शिक्षणासाठी शहरातील वसतिगृहात राहते. एप्रिल २०२३ पासून पीडित शिकवणीला जात असताना संशयित आशिष तिचा वारंवार पाठलाग करीत होता.

सांगली : येथील शंभर फुटी रस्ता परिसरातील हँग ऑन कॅफेत (Hang On Cafe) अल्पवयीन मुलीला (Minor Girl) गुंगीचे औषध देत अश्‍लील व्हिडिओ तयार करून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी आशिष शरद चव्हाण (वय २५, रा. बस्तवडे, ता. तासगाव) याच्यावर गुन्हा नोंद केला. विश्रामबाग पोलिसांनी (Vishram Bagh Police) त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली. दरम्यान, आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे.

या घटनेनंतर कोणतीही कारवाई न झाल्याने शहरातील कॅफे शॉपमधील अश्लिल प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक झाली. आज संघटनेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 100 फुटी रोडवर असलेले एकापाठोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आले. सध्या पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या 16 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती सांगलीतील एका महाविद्यालयात (College) शिक्षण घेते. काही महिन्यांपूर्वी संशयित आशिषसमवेत तिची ओळख झाली होती. पीडित शिक्षणासाठी शहरातील वसतिगृहात राहते. एप्रिल २०२३ पासून पीडित शिकवणीला जात असताना संशयित आशिष तिचा वारंवार पाठलाग करीत होता. पीडित तरुणीचा मोबाईल क्रमांक घेऊन तो सतत तिला मेसेज करीत होता. पीडितेने याला विरोध केला होता.

Sangli Crime

यावरून संशयित आशिष याने पीडितेस धमकावले होते. २२ एप्रिल २०२४ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयित आशिषने पीडितेस त्याच्या दुचाकीवरून शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफे शॉपमध्ये नेले. तेथे कॉफीमधून तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर स्वत:च्या मोबाईलमध्ये पीडितेचे अश्‍लील व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी संशयित आशिष यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

कॅफे शॉपविरोधात शिवप्रतिष्ठानचे आंदोलन

शहरातील कॅफे शॉपमध्ये सर्रास अश्लिल चाळे करण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आला आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. दरम्यान, पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या 16 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT