Acceleration of lining of Takari main canal 
पश्चिम महाराष्ट्र

ताकारीच्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम गतीने

रवींद्र मोहिते

वांगी : वांगी (ता. कडेगांव) परीसरातून वाहणाऱ्या ताकारी योजनेच्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम गतीने सुरु आहे. त्यामुळे पाणी न मुरता वेगात पुढे सरकणार आहे. परंतू जमीनीत पाणी न मुरल्याचा फटका या परीसरांतील शेतीला बसणार असून बागाईत क्षेत्र घटण्याची भिती व्यक्त होत आहे. 
मागील सुमारे 20 वर्षांपासून ताकारी योजनेच्या पाण्यामुळे वांगी परीसराचे नंदनवन झाले आहे. कायम दुष्काळी असणारा कलंक या योजनेने पुसून टाकला आहे. ताकारीचे पाणी वर्षातून उन्हाळ्यात केवळ 5 वेळा येत असते. प्रत्येक पोटकालव्यातून ते फक्त 8 दिवस सोडले जाते. 

दरम्यान यावेळी मुख्य कालव्यातून प्रचंड पाझराचे पाणी सर्व ओढे - नाल्यातून महिनाभर अखंडपणे वाहत असे. परिणामी ओढाकाठावरील विहिरी उन्हाळभर तुडूंब राहत असत. आणि या विहिरींचे पाणी पुढील महिनाभर पिकांना पुरत असे. आता मात्र मुख्य कालवा अस्तरीकरण होत असल्याने पाणी मुरणारही नाही आणि ओढे वाहणारही नाहित. त्यामुळे आठवडाभर येणाऱ्या पोटकालव्यातील पाण्यावर कोणती पिके घ्यायची ? आणि त्यानंतर ताकारीच्या पुढील आवर्तनापर्यंत सदर पिकांना पाणी कुठले द्यायचे ? हा प्रश्न जटील बनणार आहे. 

गावाच्या दोन्ही बाजूने सहा कि.मी. वाहणाऱ्या दोन ओढ्यावर सुमारे 500 विहिरी असून गावचे 90 टक्के सिंचनक्षेत्र या विहिरींवर अवलंबून आहे. ओढ्यातून पाणी न सोडल्यास या विहिरी कायम कोरड्या राहणार असून बागाईत शेती उध्वस्त होण्याची भिती व्यक्त होत आहे. ताकारी सिंचन विभागाने सदर ओढ्यांसाठी मुख्य कालव्यावर गेट बसवून ताकारी योजना सुरु असताना ओढे सतत प्रवाहित राहतील यासाठी नियोजन करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT