accident
accident 
पश्चिम महाराष्ट्र

टाटा मेमोरिअलच्या 40 डॉक्‍टरांचा अपघात, दोघांची प्रकृती चिंताजनक

सकाळवृत्तसेवा

नगर : नगर-पुणे रस्त्यावर केडगाव जवळ नगर शहर बाह्यवळण रस्त्यानजीक ट्रॅव्हल्सने कंटेनरला धडक दिली. ही घटना आज पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. यात मुंबईतील टाटा मेमोरिअल ट्रस्ट व इतर रुग्णालयातील 40 कर्करोग तज्ज्ञ डॉक्‍टर जखमी झाले. अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक अल्ताफ अहमद (वय 37, रा. कुर्ला, मुंबई) याचा जागीच मृत्यू झाला. 

टाटा मेमोरिअल ट्रस्ट व इतर ठिकाणचे मुंबईतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्‍टर वेरूळ (जि. औरंगाबाद) येथे कर्करोगा संदर्भातील परिसंवादात सहभागी होण्यासाठी चालले होते. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स नगर-पुणे रस्त्यावरील केडगाव येथील नगर शहराच्या बाह्यवळणाजवळून जात होती. चालकाकडून ट्रॅव्हल्सचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. या अपघात एवढा भीषण होता की यात ट्रॅव्हल्समधील 40 डॉक्‍टर जखमी झाले. जखमींपैकी 12 महिला डॉक्‍टर आहेत. यातील डॉ. पुष्कर इंगळे यांच्या डोक्‍याला मार लागल्याने व छातीला मार लागल्याने डॉ. अनिल तिबडेवार त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमी डॉक्‍टरांना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

जखमी डॉक्‍टरांची नावे 
डॉ.आकांशा अनुप, डॉ. पल्लवी खुरुड, डॉ.स्वाती चूग, डॉ.निशिता सेहरा, डॉ.हर्षता के., डॉ.केतकी अडसूळ, डॉ.निखिल कल्याणी, डॉ.असफिया खान, डॉ.देबांजली दत्ता, डॉ.सचिता पाल, डॉ.मनीष बदाणे, डॉ.प्रशांत नायक, डॉ.जॉनी कार्ल्टन, डॉ.उन्मेश मुखर्जी, डॉ.जाहिद मुलानी, डॉ.कस्तुरी बरवा, डॉ.सय्यक डे, डॉ.सचित आनंद, डॉ.गार्गी मुळे, डॉ.जिम्पी जोश, डॉ.अनुज कुमार, डॉ.जिन्स मॅरी मॅथ्यू, डॉ.प्राची सावंत, डॉ.समर्पिता मोहंती, डॉ.अजय शशीधर, डॉ.सुलगना मोहंती, डॉ.व्ही.मूर्ती, डॉ. ए. टेबीदेवाल, डॉ. दीपांजली अडळूकर, डॉ.सागर गायकवाड, डॉ.भाविन विषारिया, डॉ. दीपक देशमाने, डॉ.उपासना सक्‍सेना, डॉ.तिरंजल बसू, डॉ.आशिष, डॉ.पुष्कर इंगळे, डॉ.अमेंद्र, डॉ. रवीशंकर दास, डॉ. प्रारंध सिंग, डॉ. प्रिती सुब्रह्मण्यम 

अपघातात दोन डॉक्‍टरांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे वेरूळ येथील कर्करोग तज्ज्ञांचा परिसंवाद कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. 
- डॉ. सतीश सोनवणे, संचालक, मॅक्‍सकेअर हॉस्पिटल, नगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT