accident of ITBP and one truck in belgaum but no soldier injured in this accident 
पश्चिम महाराष्ट्र

सुदैवाने जवान बचावले ; भरधाव ट्रकची बॉर्डर पोलिसांच्या बसला धडक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : भरधाव ट्रकने इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी)च्या बसला जोराची धडक दिल्याने बसमधील सात जवान जखमी झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी घाटातील राम ढाब्याजवळ शुक्रवारी (ता. २५) रात्री हा अपघात घडला. याप्रकरणी आयटीबीपीचे साहाय्यक कमांडंट प्रवाह परिमळ यांनी फिर्याद दिली असून अपघाताची नोंद काकती पोलिस ठाण्यात झाली आहे.

राजेश गुप्ता (वय २८), सकाना रोहित (वय २९), गोपाळ सुमान (वय २७), दाबी दिनेश (वय २९), श्‍यामलाल (वय ५३), राशपाल सिंग (वय ५०) आणि ई. शिवकुमार (वय ४३) अशी जखमी जवानांची नावे असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

शुक्रवारी रात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून संकेश्‍वरकडे ट्रक (एमएच ०९ सीयू ८८११) भरधाव वेगाने जात होता. सुतगट्टी घाटात राम ढाब्याजवळ महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या आयटीबीपीच्या बसला ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात बस महामार्गावर उलटली. त्यामुळे यात सात जवान जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटविण्यात आली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

Parner News : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या पारनेर जागेसाठी नीलेश लंके विरुद्ध राहुल शिंदे; थेट लढत निश्चित

M.Pharmacy Admission : एम. फार्मसीच्या चौथ्या फेरीत चार हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; २४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

CJP Leaders Bail Update : सौरव दास, आशुतोष रांका यांची तुरुंगातून सुटका; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात CJP पुन्हा आक्रमक

SCROLL FOR NEXT