accident  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Bus Accident : भरधाव बसची बंद पडलेल्या टोल नाक्याला धडक; महिला वाहकासह दहा प्रवासी जखमी

सांगली शहरानजीक असणाऱ्या सांगलीवाडी येथील बंद पडलेल्या टोल नाक्याला भरधाव बस (एमएच ९५०३) ने जोराची धडक दिल्याने अपघात झाला.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - सांगली शहरानजीक असणाऱ्या सांगलीवाडी येथील बंद पडलेल्या टोल नाक्याला भरधाव बस (एमएच ९५०३) ने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदरचा अपघात हा आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. धडक ही इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता.

अपघातानंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. जखमींना नागरिकांच्या साहाय्याने बाहेर काढून उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बसमधील महिला वाहक गंभीर जखमी झाल्या आहेत. बी. बी. खोत असे त्यांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नाईकबा ते सांगली ही बस आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगलीकडे येत होती. चालक तुकाराम बाबासो कुलकर्णी (वय ४३, रा. भडकंबे) हे सदरची बस घेऊन सांगलीकडे येत होते.

सांगली शहरानजीक असणाऱ्या सांगलीवाडीच्या बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ बस आली. यावेळी बसच्या पुढे बैलगाडी असल्याने चालकाने अचानक लेन बदलली आणि ब्रेक मारला. रस्त्यावर चिखल असल्याने बस थेट बंद पडलेल्या टोल नाक्यावर जाऊन आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. या अपघातामध्ये बस मधील चालक आणि महिला वाहकासह दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले. यातील महिला वाहक खोत या गंभीर जखमी झाल्या. बसमध्ये पन्नास प्रवाशी प्रवास करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली.

नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने सांगलीतील वसंतदादा पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची एसटी प्रशासनाकडून गांभिर्याने दखल घेण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT