accident in sankeshwar nipani one person dead in accident 
पश्चिम महाराष्ट्र

काम संपवून घरी परतत असताना संतोषवर काळाने घातला घाला ; अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (बेळगाव) : येथील संकेश्वर-हुक्केरी मार्गावर नेर्ली फाट्यावर दुचाकीने बैलगाडीला मागून धडक दिली. काल (ता. ९) रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. संतोष ऊर्फ सत्याप्पा भीमप्पा माळगी (वय ३६,  रा. यलिमुन्नोळी, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. संतोष माळगी दुचाकीने (केए ४९ आर १३२४) निघाला जात असता त्याने नेर्ली फाट्यावर बैलगाडीला मागून धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

उपचारांसाठी येथील शासकीय रुग्णालयात व त्यानंतर
पुढील उपचारासाठी हुबळीला नेताना त्याचे वाटेतच निधन झाले. संतोष कामामिमित्त कोचरी गावी गेला होता. तेथील काम संपवून घरी परतताना अपघात झाला. या अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक जे. बी. कोगेनहळ्ळी यांनी भेट देऊन पंचनामा केला. संकेश्वर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT