accident to tractor trolly and truck in mangur belgaum but no injury in accident 
पश्चिम महाराष्ट्र

दैवच बलवत्तर ; ट्रॅक्टर - ट्रकच्या भीषण अपघातातून बचावले दोघे

सकाळ वृत्तसेवा

मांगूर (बेळगाव) : कुन्नूर-मांगूर रस्त्यावर गोदाई ओढ्यानजीक झालेल्या अपघातात मालवाहू ट्रक व उसाच्या ट्रॅक्टरचा अक्षरशः चक्काचूर झाला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. त्यात सुदैवानेच चालक बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी, मांगूरहून कुन्नूरच्या दिशेने मालवाहू ट्रक (एमएच 46 बीएफ 0784) व आडीहून हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे उसाच्या कांडीने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली (केए 19 टी 7307) निघाली होती. त्यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉलीचा चक्काचूर होऊन ट्रकचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात ट्रकचा चालक जखमी झाला आहे. या धडकेत रस्त्याकडेला असलेल्या लोखंडी बाजूपट्ट्या तुटून ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन्ही ट्रॉली 15 फूट खोल ओढ्यात पडल्या. ट्रॉलीतील उसाच्या कांड्या सर्वत्र विस्कटल्या. या अपघातात ट्रॅक्टरचेही नुकसान झाले आहे. उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती. 

अपघाताचे दृश्य भीषण

कुन्नूर-मांगूर रस्त्यावर झालेल्या अपघाताचे दृश्य भीषण होते. इतका मोठा अपघात होऊनही दोन्ही वाहनातील चालक सुखरूप आहेत. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नसल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

रस्ता रुंद पण, अपघातांची मालिका कायम 

कुन्नूर-मांगूर रस्त्यावरील गोदाई ओढ्यानजीक गेल्या तीन वर्षात त्याच ठिकाणी बाराहून अधिक लहान-मोठे अपघात झाले आहेत. वर्षभरापूर्वी या ठिकाणी रस्ता अरुंद होता. सध्या रस्ता रुंदीकरण होऊन बाजूला लोखंडी कठडे असूनही आता पुन्हा अपघात होत आहेत. याला जबाबदार वाहनधारकच आहेत, याचीही चर्चा परिसरात सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

Dead Whale Found Are Ware Beach : 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद! कोकणच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत; 4 तासांच्या थरारानंतर विल्हेवाट

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

Insta-Fb New Rules : मृत्यूनंतर तुमचं फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? ‘डिजिटल मृत्युपत्र’ अन् ‘डिजिटल वारसा कायदा’ काय आहे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT