accident of truck and two wheeler in nerle sangli girl dead in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत युवती ठार

विजय लोहार

नेर्ले (सांगली) : येथील आशियायी महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातात येडेनिपाणीतील युवती ठार झाली. अश्विनी आनंदा पावलेकर (वय २२, येडेनिपाणी, ता. वाळवा (सध्या कऱ्हाड) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.

कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सकाळी साडेनऊ वाजता अश्विनी पावलेकर ह्या दुचाकी (एम एच ५० जी ३५०१) यावरून कऱ्हाडहून इस्लामपूरला निघाल्या होत्या. हॉटेल मणिकंडन व पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर ट्रॅक्‍टरला ओव्हर टेक करीत असताना महामार्गावर मागून भरधाव येणाऱ्या ट्रक (के ए १९ ए बी १९०६) ने अश्विनी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अश्विनी यांना गंभीर दुखापत होऊन त्या ठार झाल्या.

महामार्गावर बघ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले. विजय पावलेकर यांनी फिर्याद दिली. ट्रकचालक महंमद अकबर एमशेख अब्दुल कादर (वय २६, कर्नाटक) विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सोमनाथ वाघ तपास करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT