Accidentally grabbed the handle of the rickshaw 
पश्चिम महाराष्ट्र

अपघातानंच रिक्षाचं हॅंडल हाती घेतलं, भेदला चक्रव्यूह 

अजित कुलकर्णी

सांगली : चला सांगली... अशी कानडी हेलातील महिलेची हाक रिक्षा थांब्यावर ऐकली की क्षणभर काही तरी वेगळं ऐकतोय, असं वाटतं. त्या असतात वैशाली विजय गुरव. त्या सांगली शहरातील पहिल्या रिक्षाचालक ठरल्या आहेत. आपल्या चिमुकल्यांच्या भवितव्यासाठी त्यांनी पुरुषी मक्तेदारीच्या या क्षेत्रात पाऊल टाकले. 

टी-शर्ट, जीन्स परिधान केलेल्या वैशाली यांचं सफाईदारपणे रिक्षा चालविणे सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले आहे. जिभेवर साखर ठेवून त्या प्रवाशांशी संवाद साधतात. महिला वर्गासाठी तर त्यांचं असणं हक्काच्या बहिणीसारखं आहे. वैशाली कर्नाटकातील चडचणच्या... निरक्षर, मात्र व्यवहारज्ञान दांडगे... पदरात दोन मुलं... त्यांना जगविण्यासाठी त्या धुणीभांडी करायच्या. त्यातून घर चालेना, कोरोना संकटाने तेही काम हिरावून घेतलं. अशावेळी त्यांनी अपघातानंच रिक्षाचं हॅंडल हाती घेतलं. 

त्यांनी आपल्या या धडपडीची कथा "सकाळ'कडे उलगडली, ""शाळेत नाव घातलं होतं, एवढाच शिक्षणाशी संबंध. शेतातील सर्व कामे पुरुषांच्या बरोबरीने करायच्या. लग्नानंतर त्या शिरगाव (मलकापूर) येथे आल्या. संकटांनी तिथेही पाठ सोडली नाही. आई कर्करोगाने गेली. पती अडचणीत सापडले. कर्जाचा डोंगर वाढत गेला. अशा वेळी जत येथील अभिषेक माने यांनी त्यांना रिक्षा व्यवसायाचा मार्ग सुचविला आणि अल्प भाड्यावर आपली रिक्षाही देऊ केली. आता त्या धाडसाने रिक्षा चालवत आहेत. आर्यन व प्रीती या चिमुकल्यांना शिकवायचं, अशी जिद्द ठेवून त्यांनी हे पाऊल उचललं आहे.'' 
 
वैशाली या सांगलीतील पहिल्या महिला रिक्षाचालक आहेत. त्यांचा आमच्या संघटनेला अभिमान आहे. या क्षेत्रात महिलांनी नक्की यावे, आम्ही त्यांना बळ देऊ. थांब्यावर जागा आणि सन्मानही देऊ. 
- महादेव पवार, अध्यक्ष, रिक्षा चालक-मालक संघटना 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT