Crime-Scene
Crime-Scene 
पश्चिम महाराष्ट्र

पलायन करणाऱ्या आरोपींना पाठलाग करून पकडले

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर - शहर पोलिस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन आरोपींनी कोठडीचे लोखंडी गज कापून आज पहाटे पलायन केले.

पोलिसांच्या गस्तीपथकाने पाठलाग करून त्यांना पुन्हा पकडले. विशाल दत्तात्रेय तांदळे (वय 22, रा. मंचर, ता. आंबेगाव) व कलीम अकबर पठाण (वय 20, रा. निंबाळे चौफुली, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत.

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील हे दोन आरोपी पोलिस ठाण्याच्या कारागृहात सध्या न्यायालयीन कोठडीत होते. त्यांनी संगनमताने कारागृहाच्या कोठडी क्रमांक दोनचे तीन लोखंडी गज हॅक्‍सॉने कापले. पहाऱ्यावरील पोलिस नाईक श्रीपत साबळे यांना धक्का देऊन त्यांनी पहाटे पलायन केले. याबाबत माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. सुमारे दोन ते अडीच किलोमीटरवर म्हाळुंगी नदीजवळ दोघांनाही ताब्यात घेतले. विशाल तांदळे या आरोपीने यापूर्वीही पुणे ग्रामीणच्या राजगुरुनगर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून खिडकीचे गज कापून पलायन केल्याचे समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : लखनौची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT