Crime Sakal
पश्चिम महाराष्ट्र

कैदेत असणार्‍या आरोपीने पोलिसावर हल्ला करून केले गंभीर जखमी

चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने एका पोलिस कर्मचार्‍याच्या डोक्यात स्टीलचे बकेट व वीट घालून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बादल सर्जे

जत - चोरीच्या गुन्ह्यात (Crime) अटकेत असलेल्या आरोपीने (Accused) एका पोलिस (Police) कर्मचार्‍याच्या डोक्यात स्टीलचे बकेट व वीट घालून गंभीर जखमी (Injured) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्ञानेश्वर शामराव पाटील (वय ५७) असे पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव असून गुरूवारी दि. ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

यामध्ये संशयित आरोपी राजू सहदेव नाईक (वय २०, रा. कल्लोती, ता. अथणी, जि. बेळगाव) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलिस ठाण्यात प्रचंड गदारोळ माजला होता.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की संशयित आरोपी राजू नाईक याला जत पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या दरम्यान येथे हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील हे आपली सेवा बजावत होते. आरोपीने लघूशंकेच्या बहाण्याने त्यांना मला बाहेर जायचे आहे, मला चावी द्या, असे म्हणत जवळच असलेले स्टीलचे बकेट पोलिस कर्मचारी पाटील यांच्या डोक्यात घातले. शिवाय शेजारील वीट ही डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले.

दरम्यान, कोठडीतून बाहेर पडण्यासाठी पाटील यांच्या सोबत झोंबाझोंबी केली. यामध्ये त्यांची डाव्या हाताची करंगळीला ही गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर इतर पोलिस कर्मचार्‍यांनी आरोपी राजू याला कैदेत ठेवत, जखमी ज्ञानेश्वर पाटील यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या घटनेचा अधिक तपास पोलिस कर्मचारी मिसाळ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT