The accused escaped from the civil hospital marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयातून आरोपी पसार

सकाळ वृत्तसेवा

नगर : विनापरवाना गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने सोमवारी (ता.13) सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोलिसांना चकवा देत पलायन केले. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड, सावेडी) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

कोतवाली पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बाह्यवळण मार्गावर गांजाची वाहतूक करताना दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 75 हजार रुपये किंमतीचा गांजाही पोलिसांनी हस्तगत केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी सागर धनापुरे यास अटक केली होती. 

पाठलाग करण्याचा प्रयत्न व्यर्थ

मागील दोन दिवसांपासून पोटात दुखत असल्याचे सागर सांगत होता. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी त्यास रविवारी (ता.12) रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सोमवारी सकाळी एक पोलिस कर्मचारी त्याला जिल्हा रुग्णालयात प्रांत:विधिसाठी घेऊन जात होता. त्यावेळी त्याने पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देत जिल्हा रुग्णालयातून धूम ठोकली. कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग करीत पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत आरोपी सागर धनापुरे पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली. 

जिल्हा रुग्णालयात होतात असे प्रकार 
दरम्यान, नगरमधील पोलिसांना चकवा देत गुन्हेगार पसार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा प्रकारे अनेक वेळा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यातून पसार झाले आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयातून अथवा वाहनातून उडी मारून पळून जाण्याच्या घटनांच अधिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT