Action on Mokat Animals "Fars" ..! 
पश्चिम महाराष्ट्र

मोकाट जनावरांवरील कारवाई "फार्स'..!

सकाळ वृत्तसेवा

नगरः शहरातील मोकाट जनावरांच्या प्रश्नावर नगरसेवकांनी, दोनच दिवसांपूर्वी निवृत्त झालेले आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना घेराव घालून आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांवरील कारवाईचा कृतिआराखडा तयार करण्याचे आश्वासन दिले. यावर लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येईल, असेही सांगितले. मात्र, महापालिकेकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मोकाट जनावरे पकडण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने, कारवाईचा कृतिआराखडा कागदावरच उरला आहे. त्यामुळे महापालिकेची मोकाट जनावरांवरील कारवाईची वल्गना "फार्स' ठरत आहे. 

जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी या संदर्भात आज सायंकाळी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. महापालिकेकडे शहरात पकडलेल्या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रकल्प पिंपळगाव माळवी येथे आहे. या प्रकल्पात मोकाट कुत्री ठेवण्यासाठी जागा कमी पडत असल्याने, महापालिकेने तीन नवीन शेड तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यातील दोन शेड तयार झाल्या आहेत. तिसऱ्या शेडचे काम सुरू आहे. मोठी मोकाट जनावरे ठेवण्यासाठी महापालिकेकडे वडगाव गुप्ता रस्त्यावर जागा आहे; मात्र तेथे जनावरे ठेवण्यासाठीचे बांधकाम सुरूच झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने मोठी मोकाट जनावरे पकडली तर ठेवायची कोठे, असा प्रश्‍न निर्माण होतो. यावर तोडगा म्हणून महापालिका प्रशासन या जनावरांवर कारवाई करण्याचे टाळत आहे. 

वाहतुकीला अडथळा 

शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नगरसेवकांनी तत्कालीन महापालिका आयुक्‍तांना विधानसभा निवडणुकीच्या आधी घेराव घातला होता. त्या वेळी तत्कालीन आयुक्‍त भालसिंग यांनी शहरातील मोकाट जनावरांवर कारवाईसाठीचा कृतिआराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेकडील कोंडवाडा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. भालसिंग सेवानिवृत्त झाले तरीही हा आराखडा कागदावरच राहिला आहे. महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने शहरातील मोकाट जनावरांच्या प्रमाणात व त्रासात वाढ झाली आहे. शहरातील रस्त्यांवर दिसणारी जनावरे आता महामार्गांवरही आपले बस्तान बसवू लागली आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खड्डेयुक्‍त रस्त्यांवरून जनावरांचा अडथळा पार करत चालणे नगरकरांना कठीण झाले आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

SCROLL FOR NEXT