Action taken against the dangerous and unstable Flex karad
Action taken against the dangerous and unstable Flex karad 
पश्चिम महाराष्ट्र

धोकादायक आणि विनापरवाना फ्लेक्सच्या विरोधात कराड पालिकेची कारवाई

सचिन शिंदे

कऱ्हाड- शहरातील धोकादायक आणि विनापरवाना फ्लेक्सच्या विरोधात आजपासून पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातील सहाजणांना नोटीसा बजावल्या आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. जे फ्लेक्स अनाधिकृत आहेत. ज्यांची मुदत संपली आहे व जे फ्लेक्स खराब झाले आहेत. ते हटवण्यात यावेत, अन्यथा संबधितांवार कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा इशार नोटीशीद्वारे दिला आहे. 

पुण्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर शहरातील फ्लेक्ससह जाहीरातीसाठी उभारलेल्या कमानींची पहाणी पालिकेने आजपासून सुरु केली आहे. त्याबाबत, 2016 मध्ये पहिला सर्व्हे झाला होता. त्यानंतर सर्व्हे झालेला नाही. पुण्यातील दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार दिवसभरात शहरात पहाणी केली आहे. आता त्याची यादी तयार केली आहे.

पहिल्या टप्प्यात सहा जणांना फ्लेक्सबाबत पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. बसस्थानक परिसरातील सहा फ्लेक्स धारकांना फ्लेक्स काढून घेण्याचा इशारा नोटीसद्वारे दिला आहे. अन्यथा, संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यात म्हटले आहे.

त्याबाबत, डांगे म्हणाले की, शहरातील धोकादायक व विनापरवाना फ्लेक्सवर कारवाई करणार आहोत. पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्माचाऱ्यांनी आज दिवसभर त्याची पहाणी करण्यास सांगून त्याची यादी तयार केली आहे. त्या यादीनुसार उद्यापासून थेट कारवाई करणार आहोत. जे फ्लेक्स काढले जाणार नाहीत. त्या फ्लेक्सधारकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT