पश्चिम महाराष्ट्र

‘टिक-टॉक’खाली धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ‘टवाळखोरांच्या त्रासाला घाबरायचं नाही. पोलिस तुमच्या सुरक्षिततेसाठीच आहेत. फक्त हेल्पलाइनला एक फोन करायचा. दुसऱ्या मिनिटास आम्ही तुझ्या मदतीला येतो बाळ...’ अशा पद्धतीच्या समुपदेशनातून संबंधित शाळकरी मुलींत नीडरता व आत्मविश्‍वास निर्भया पथकाने केला. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी ‘टिक टॉक’ व्हिडिओच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांना कारवाईचा हिसकाही दाखविला.

शहर परिसरात छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर निर्भया पथकाने कारवाईची व्यापक मोहीम हाती घेतली. ‘शहरातील चौक बनले छेडछाडीचे केंद्र’ या आशयाखाली ‘सकाळ’ने छेडछाडीच्या प्रकारावर प्रकाशझोत टाकला. चार दिवसांपूर्वी मंगळवारपेठेत एका शाळकरी मुलीला छेडण्याचा प्रकार झाला होता. संबंधित टवाळखोराचा शोध पथकाने सुरू केला. इतकेच नव्हेतर संबंधित मुलीचे समुपदेशन करून तिच्यात अशा प्रवृत्तीविरोधात लढण्याचे धाडस निर्माण केले. पोलिसांच्या या उपक्रमाचे पालक वर्गातून स्वागत केले जात आहे. 

दरम्यान उद्यमनगर-यादवनगर परिसरात एका तरुणीला एक तरुण वारंवार छेडत होता. तिने याबाबत पोलिसांत तक्रार देण्याचा विचार केला; मात्र तिचे धाडस होत नव्हते. अखेरीस तिने याबाबतची तक्रार हेल्पलाइनकडे केली. तिला केवळ त्या टवाळखोराचा मोपेड क्रमांक अर्धवट लक्षात होता. त्या क्रमांकावरून त्या टवाळखोराचा शोध निर्भया पथकाने घेतला. कारवाईच्या भीतीने तो आपल्या आईसमोर गयावया करू लागला. इतकेच नव्हेतर त्याने तरुणीकडून थेट राखी बांधून घेतली. येथून पुढे मोठा भाऊ म्हणून त्या तरुणीचे रक्षण करू असे अभिवचनही पथकासह पालकांना दिले.

महावीर गार्डनमध्ये ‘टिक टॉक’ व्हिडिओच्या नावाखाली तरुण धिंगाणा घालत होते. याचा त्रास गार्डनमधील इतरांना होत होता. याठिकाणी निर्भया पथकाने छापा टाकून संबंधित टवाळखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. त्याचे स्वागत गार्डनमध्ये फिरायला येणाऱ्या महिलांसह आबालवृद्धांनी केले. कारवाईच्या मोहिमेत पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक अनिता मेणकर यांच्या नेतृत्वाखाली अविनाश तारळेकर, सूरज भोपळे, किशोर पाटील, सविता पाटील, कोमल पाटील हे सहभागी झाले होते.

शाळा-महाविद्यालयांसह गर्दीच्या ठिकाणी निर्भया पथक लक्ष ठेवून आहे. छेडछाडीबाबतची तक्रार देण्यासाठी संबंधित महिलांनी निर्भयपणे पुढे यावे. त्यासाठी १०९१ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा.
- अनिता मेणकर,
उपनिरीक्षक, निर्भया पथक प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT