activist waved a red and yellow flag in front of the Municipal Corporation under police protection belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकात कार्यकर्त्याने पोलीस बंदोबस्तात महापालिकासमोर फडकविला लाल पिवळा झेंडा

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या बेळगाव महापालिकेसमोर लाल पिवळा झेंडा फडकविण्याची आगळीक सोमवारी कन्नड संघटनांनी केली. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात हा प्रकार घडला. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा झेंडा लावण्यात आला आहे. श्रीनिवास ताळूकर नामक एका कन्नड कार्यकर्त्याने आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा प्रकार केला आहे. 

महापालिका कार्यालयावर लाल पिवळा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न याआधीही झाला आहे. पण त्याला यश मिळाले नव्हते. यंदा १ नोव्हेंबर रोजी पहाटे असा प्रकार घडला होता पण पोलीसानी तो झेंडा हटविला होता. यावेळी ध्वजस्तंभ व झेंडा घेऊनच कन्नड कार्यकर्ते महापालिकेत गेले. चक्क काँक्रीट घालून तेथे स्तंभ उभारण्यात आला व त्यावर झेंडा लावण्यात आला. 

गेल्या आठवड्यात आरटीओ सर्कल येथील मराठी फलकाला काळे फासण्याचा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे फलकावरील आमदार अनिल बेनके यांच्या फोटोला काळे फसण्यात आले होते. या माध्यमातून मराठी भाषिकांचे खच्चीकरण करण्याचा कन्नड संघटनांचा प्रयत्न सुरूच आहे. महापालिका कार्यालयासमोर लाल पिवळा झेंडा फडकविण्याचा हा प्रयत्न महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झाल्याची माहिती मिळाली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचं मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT