पश्चिम महाराष्ट्र

पानसरे यांच्या हत्येपूर्वी सीसीटीव्हीची रेकी

भुषण पाटील

कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी सीसीटीव्ही कोठे आहेत याची रेकी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती अशी कबुली अमित देगवेकर याने केली आहे. तसेच अमोल काळे याच्या डायरीतील सांकेतिक शब्दांचा खुलासा देगवेकर याने केला असल्याचा दावा एसआयटीने केला आहे. याच्या सखोल चाैकशीसाठी आठवा संशयित म्हणून अटक असलेल्या अमित देगवेकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड शिवाजीराव राणे यांनी केली. त्यानुसार आज त्याच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्यात आली.  त्याला 28 जानेवारीपर्यत कोठडीत ठेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आजच्या सुनावणी तपासातील काही महत्वपूर्ण बाबी विशेष सरकारी वकील अॅड शिवाजीराव राणे व तपास अधिकारी तिरूपती काकडे यांनी न्यायालयासमोर मांडल्या, तर तपास कॉपी पेस्ट असल्याचा पुनरुच्चार संशयितांची वकील अॅड समीर पटवर्धन यांनी केला 

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने 15 जानेवारीला बंगळुरू कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्याच्या नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा सत्र न्यायाधीश राऊळ यांच्या समोर हजर केले. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील  अॅड शिवाजीराव राणे यांनी या प्रकरणातील संशयित अमोल काळे याच्या डायरीत काही सांकेतीक शब्दांचा खुलासा केल्याचे न्यायालयाला सांगितले. त्या नुसार 2.5 म्हणजे धर्म विरोधी काम करणाऱ्या व्यक्तींना नुकसान पोहचवणे. 3 म्हणजे त्यांना संपवणे, त्यांचा इव्हेंट करणे असा होता. पानसरे यांचा इव्हेंट करण्यापूर्वी भागातील सीसीटीव्हीची रेकी करण्याची जबाबदारी होती  अशी कबुली त्याने दिली असल्याचेही न्यायलयात अॅड राणे यांनी सांगितले.

हत्येसाठी चोरून आणलेल्या मोटार सायकलीची महिती देगवेकरला आहे  त्याच बरोबर घटने अगोदर तो वीरेंद्र तावडे सोबत चार ते पाच वेळा कोल्हापुरात आला होता. या काळात तो कोणाला भेटला कोठे राहिला याची महितो घेणे आवश्यक आहे.  तसेच शस्त्रास्त्र प्रशिक्षणानंतर शस्त्रे कोठे नेली. या शस्त्रांचा कशासाठी वापर झाला. याची माहिती देगवेकरला असल्याने त्याच्या सखोल चौकशीसाठी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी अॅड राणे यांनी केली 
तर सशयितांच्यावतीने बाजू मांडताना या आधी एसआयटीने अमोल काळे व वीरेंद्र तावडेला ताब्यात घेतले होते.  त्या वेळी या बाबी का समोर आल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित करत पोलीस कोठडीसाठी बालिश कारणे दिली जात असल्याचा युक्तिवाद केला. 

दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायाधिश राऊळ यांनी अमित देगवेकरच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ करत त्याला 28 जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT