The administrator of Belgaum Municipal Corporation will change for the sixth time 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव महापालिकेचे प्रशासक बदलणार सहाव्यांदा ...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव  : बेळगाव महापालिकेचे प्रशासक माहिनाभरानंतर पुन्हा बदलणार आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस बी बोमनहळ्ळी हे सध्या महापालिका प्रशासक आहेत. पण  ३० जून रोजी ते निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीमुळे प्रशासकपद रिक्त होणार आहे. नवे जिल्हाधिकारी किंवा प्रादेशिक आयुक्त महापालिकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केले जातील. बेळगाव महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यापासून आतापर्यंत पाच अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून कामकाज पाहिले आहे. जुलै महिन्यात पुन्हा नव्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती होणार आहे. 


९ मार्च २०१९ रोजी महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपला. त्यावेळी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होईल अशी अटकळ होती. पण शासनाने त्यावेळी म्हणजे १५ मार्च रोजी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी तुषार गिरीनाथ प्रादेशिक आयुक्त होते. त्यांनी काही काळ प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. गिरीनाथ यांच्या बदली नंतर दीपा चोळण काही काळ प्रभारी प्रादेशिक आयुक्त होत्या त्यामुळे त्यांनी काही काळ प्रशासक म्ह्णून कामकाज केले.

आमलान बिश्वास यांची प्रादेशिक आयुक्त म्ह्णून नियुक्ती झाल्यावर त्यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी आली. त्यांच्या कार्यकाळात विविध कारणांमुळे बेळगाव महापालिका सातत्याने चर्चेत राहिली. त्यांच्या धडाकेबाज कामामुळे त्यांना प्रशासक पदावरून हटविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. या प्रयत्नांना यश आले व त्यांना प्रशासक पदावरून हटवून जिल्हाधिकारी बोमनहळ्ळी यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त होणार आहे.


प्रशासक नियुक्त झाल्यावर सहा महिन्यात महापालिका निवडणूक होणे आवश्यक होते. पण महापालिकेची अद्याप निवडणूक झालेली नाही. बेळगाव शहराची प्रभाग पुनर्रचना नव्याने करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पण त्याबाबत अद्याप शासनाने अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे पुनर्रचना झालेली नाही. कोरोना व लॉक डाउन मुळे ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. त्यामुके निवडणूक लांबणीवर पडणार व पर्यायाने प्रशासकाना मुदतवाढ मिळणार हे नक्की आहे. पण केवळ प्रशासक बदलणार व नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT