Admitted to a youth hospital at Deolali Pravara 
पश्चिम महाराष्ट्र

CoronaVirus : सौदीतून आलेला देवळाली प्रवराचा तो तरूण पळाला...पण

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : सौदी अरेबिया येथे नोकरीस असलेला देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील तरुण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मायदेशी परतला. पुणे विमानतळावर आरोग्य व पोलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून त्याने पलायन केले. पुण्यातील फ्लॅटमध्ये आला. शेजारील नागरिकांनी त्याला राहण्यास मज्जाव केला. तेंव्हा, त्याने थेट देवळाली प्रवरा गाठले.

दरम्यान, पुण्यातून प्रशासनाचे चक्र फिरले. राहुरीतील आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासनाची धावपळ उडाली. काल (सोमवारी) या कोरोना संशयित तरुणाला नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती केलं. त्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
समजलेली माहिती अशी : देवळाली प्रवरा येथील एक तरुण सौदी अरेबिया येथे नोकरीस आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. पुणे विमानतळावर शनिवारी (ता. 14) आल्यावर त्याने पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांची नजर चुकवून काढता पाय घेतला. त्यांच्या पुणे येथील फ्लॅटवर तो गेला.

शेजारील नागरिकांनी त्याला तेथे राहण्यास मज्जाव केला. त्यामुळे, त्याच दिवशी मध्यरात्री तो देवळाली प्रवरा येथे घरी परतला. घरातील व्यक्तींनी त्याची स्वतंत्र खोलीत व्यवस्था केली. तो कोणाच्याही संपर्कात येणार नाही याची दक्षता घेतली.

दरम्यान, पुण्यातील फ्लॅट शेजारच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी (पुणे) यांना तरुणाची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी पुणे विमानतळाच्या कार्यालयातून तरुणाचा मूळ राहण्याचा पत्ता मिळविला. काल (सोमवारी) राहुरीच्या प्रशासनाला तरुणाची माहिती देण्यात आली.

प्रशासनाने त्या संशयित तरुणाच्या घरी संपर्क साधला. त्या तरुणास नगरच्या कोरोनो संशयितांच्या कक्षात उपचारासाठी दाखल करण्याच्या सूचना केल्या. रुग्णवाहिकेतून संशयित तरुणास नगर येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. नंतर, प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. त्या संशयित तरुणाच्या रक्ताची व घशातील द्रवाची तपासणी केली जाईल. नंतर, त्याला कोरोनाची बाधा झाली की नाही, हे समजणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : 'दोनच मागण्या... एसआयआर रद्द करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या!'; राज ठाकरेंचा मुंबईतील मोर्चात हुंकार

Water Shortage: नदी-नाले कोरडे; मासेमारांच्या जाळ्यातही ‘दुष्काळ’ ; मासे मिळेनात ; पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट

Employee Code चा ‘हा’ अंक का मानला जातो शुभ? करिअरमध्ये पुढे जाण्याचे मिळतात ‘हे’ संकेत!

Drought Farmers: दुष्काळामुळे शेतकरी संकटात; ऊसाला ५ हजारांची पहिली उचल देण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक

Millionaire Numerology: लहान वयातच मिळतं नाव, पैसा अन् प्रसिद्धी! ‘या’ तारखेला जन्मलेले लोक भविष्यात होतात करोडपती म्हणे; नशीब असतं जबरदस्त

SCROLL FOR NEXT