Rohit Patil vs Prabhakar Patil Tasgaon Assembly Election esakal
पश्चिम महाराष्ट्र

तब्बल 20 वर्षांनंतर विधानसभेसाठी आबा-काका गट येणार आमने-सामने; लोकसभेनंतर विधानसभेसाठी कार्यकर्ते लागले कामाला!

लोकसभा निवडणुकीची चर्चा अजून सुरू असतानाच तासगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे.

रवींद्र माने

येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे रणांगण सुरू होणार आहे. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

तासगाव : लोकसभा निवडणुकीची चर्चा अजून सुरू असतानाच तासगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. तब्बल २० वर्षांनंतर विधानसभेसाठी आबा-काका गट आमने-सामने येण्याची चिन्हे दिसू लागली असून, रोहित पाटील (Rohit Patil) आणि प्रभाकर पाटील (Prabhakar Patil) यांनी प्राथमिक बैठका सुरू केल्या आहेत. लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

तासगाव, कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ (Tasgaon, Kavathe Mahankal Assembly Constituency) तयार झाल्यापासून तीन विधानसभा निवडणुका आणि एक पोटनिवडणूक झाली आहे. येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे रणांगण सुरू होणार आहे. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. २००४ च्या निवडणुकीनंतर आणि तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ तयार झाल्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी आबा काका गट प्रथमच आमने-सामने येऊ घातले आहेत.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. २००९ मधे मतदारसंघ पुनर्रचना होऊन तासगाव, कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर २००९ ते २०१९ दरम्यान तीन विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र दिवंगत नेते आर. आर. पाटील आणि माजी खासदार संजय पाटील अथवा त्यांचे गट हे विधानसभा निवडणुकीसाठी थेट आमनेसामने आलेच नाहीत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आबा गटाने संजयकाकांना तर विधानसभा निवडणुकीत काका गटाने आबा गटाला पाठिंबा दिला होता. आता तब्बल २० वर्षांनंतर राष्ट्रवादीकडून रोहित पाटील यांचे तर भाजपकडून प्रभाकर पाटील अशी ही दुसरी पिढी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्‍ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT