After 28 days Mangale- Sangali market opeens 
पश्चिम महाराष्ट्र

२८ दिवसांनंतर या बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास 

सकाळवृत्तसेवा

मांगले (जि. सांगली) ः येथे तीन कोरोना रुग्ण सापडल्यामुळे अठ्ठावीस दिवसांपासून बंद मुख्य बाजार पेठेने आज मोकळा श्वास घेतला.

मुख्य बाजार पेठेत वेशीजवळील आणि मारुती मंदिरासमोरील पत्रे आणि चिवकाट्यांचे अडथळे सकाळी अकारा वाजता तलाठी सुभाष बागडी, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांच्या परवानगीने काढले. यापूर्वी ग्रामपंचायत व मांगले विकास सोसायटीजवळचे अडथळे काढून गल्ल्यांतून लोकांना ये-जा करण्याची सोय करून देण्यात आली होती. 

आज सकाळी 11 वाजता अडथळे दूर केल्यानंतर व्यापा-यांनी दुकाने सुरु केली. 28 दिवसांपासून बाजारपेठ निर्मनुष्य होती. दुकाने सुरु झाल्यामुळे लोक खरेदीसाठी आले. मास्क व सोशल डिस्टन्सनसह व्यवहार झाले.  कंटेन्टमेंट झोन सोडून इतर भागातील बंद दुकानेही आज सुरु करण्यात आली. सोशल डिस्टन्सचे नियम पाळून जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला व शेतीउपयोगी साहित्याची विक्री सुरु झाली. दरम्यान, शेतकरी अंतरमशागतीत व्यस्त आहेत. सकाळी शेतात गेलेले लोक सायंकाळी घरी येतात.

दुकानांची वेळ सकाळी 9 ते 3 ऐवजी 9 ते 5 करावी, अशी मागणी होत आहे. तहसीलदार गणेश शिंदे यांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळून व मास्कसह फिरावे. ग्राहकांना मास्कशिवाय येण्यास मनाई करावी, अशा सूचना केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

मुंबईची पहिली महिला BMC कमिश्नर! देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकारी कशा बनल्या अश्विनी भिडे? जाणून घ्या रिअल स्टोरी...

गुगलवर 'फिमेल सर्व्हीस' सर्च करणं पडलं महागात; महिलांनी भेटायला बोलावलं अन्...; धक्कादायक घटना समोर

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचे, पावसाचा इशारा

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

SCROLL FOR NEXT