After 40 years, the Agrani river is out of character ....
After 40 years, the Agrani river is out of character .... 
पश्चिम महाराष्ट्र

कवठेमहांकाळला तब्बल 40 वर्षांनी अग्रणी नदी पात्राबाहेर.... 

गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ : दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरासह तालुक्‍यातील सर्वच ओढे, बंधारे,तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते. तर तब्बल पस्तीस ते चाळीस वर्षानंतर अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने महापूर सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली. नदीला महापूरसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या असलेल्या द्राक्षबागा पिकांना मोठा फटका बसला. लोणारवाडी येथील तब्बल पंचवीस वर्षानंतर यल्लमा मंदिरात पाणी शिरले होते.कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सलगरे, हिंगणगाव, मोरगाव, देशिंग परिसरातील वाहतूक सायंकाळपर्यंत बंद होती. मोरगाव येथील अग्रणी नदीचा पुल खचल्याचे चित्र आहे. 

बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरातील कमंडलू नदी (ओढापात्र)1995 नंतर पहिल्यांदा पुर आला. पुराचे पाणी शहरातील कवठेमहांकाळ - जत रस्त्यावरून वाहत होते.नदीकाठी असलेल्या मंदिरात पाणीच पाणी झाले.शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे ते दिसून येत नाहीत.

तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील खरशिंग,देशिंग,हिंगणगाव,मोरगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. आलेल्या पावसामुळे हिंगणगाव मोरगाव येथील अग्रणी नदीला महापूर सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली.नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठी असलेल्या द्राक्षबागा आणि अन्य पिकांना मोठा फटका बसला. नदीपात्राचे पाणी बाहेर पडल्याने शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेच्या चिंतेत आहे.काही भागात ऊस भुईसपाट झाला असून काही ठिकाणी माती वाहून जाण्याचे प्रकार समजत आहेत.मोरगाव येथील अग्रणी नदी पात्राबाहेर होत असल्याने नदीवरील असलेला पूल खचू लागला आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT