st bus.png 
पश्चिम महाराष्ट्र

रेड झोनमधील कामगिरीनंतर एसटी  कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करा

सकाळवृत्तसेवा

सांगली- एसटी कर्मचारी कामगिरीवर जाण्यापूर्वी आणि कामगिरीवरून आल्यानंतर प्रत्येकवेळी वैद्यकीय तपासणी करावी यासह इतर अडचणी दूर कराव्यात अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे. 


राज्य परिवहन विभागाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळून इतर विभागात 22 मे पासून एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी आंतरराज्य आणि राज्याच्या सीमेपर्यंत मजूर व विद्यार्थी यांची वाहतूक सुरूच आहे. परप्रांतात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्‍यक वैद्यकीय सुविधा व सुरक्षा साधने मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांसाठी जेवण, राहण्याच्या व इतर सुविधा अपुऱ्या आहेत. तसेच परप्रांतात गेल्यानंतरही बऱ्याचदा चांगल्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे संघटनेकडे तक्रारी येत आहेत. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधांसोबत 50 लाख रूपयाचे विमा कवच देण्याबाबत पाठपुरावा करूनही अद्याप पूर्तता केली नाही. तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित व परिपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जात नाही. 


राज्यात सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. कर्मचाऱ्यांना रेड झोनमधून नॉन रेड झोन तसेच कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन कामाची सक्ती केली जाते. अशा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा मोठा धोका आहे. काही विभागात तर रेड झोनमधून आलेल्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न करता थेट घरी पाठवले जाते. दुर्दैवाने अशा कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यास त्याच्या कुटुंबात कोरोना जाऊ शकतो. त्यामुळे रेड झोन किंवा कंटेनमेंट झोनमध्ये काम करून आलेल्यांची वैद्यकीय तपासणी केली जावी. तसेच विश्रांतीगृह सतत निर्जंतुकीकरण करावे. अति संवेदनशील भागात जाण्यासाठी पीपीए कीट किंवा अधिक सुरक्षेची साधने द्यावीत. दुर्दैवाने कर्मचाऱ्यास कोरोना झाल्यास प्रशासनामार्फत त्याचा वैद्यकीय खर्च केला जावा. 55 वर्षावरील कर्मचारी आणि गर्भवती महिलांना कोरोना संदर्भातील कामगिरीची सूट द्यावी. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर द्यावे अशा मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT